टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेता कुशल टंडन व ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री शिवांगी जोशी यांची जोडी खूप चर्चेत असलेली बघायला मिळते. ‘बरसाते – मौसम प्यार का’ या मालिकेमध्ये त्यांची जोडी खूप पसंत केली गेली. त्यांची जोडी ऑनस्क्रीन खूप पसंत केली मात्र त्यांची ऑफस्क्रीन केमेस्ट्री अधिक पसंत केली गेली. शिवांगी व कुशल यांच्या अफेअरच्या चर्चादेखील खूप रंगल्या. मात्र त्यांनी नातं खूप गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी कुशलने त्यांच्या नात्यावर खुलासा केला होता. पण आता त्यांच्याबद्दलची एक अपडेट समोर आले आहेत. (kushal tondon and shivangi joshi wedding photos)
शिवांगी व कुशल यांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. यामुळे सर्वत्र आता खळबळ उडाली आहे. त्यांचे फोटो बघताच चाहत्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान कुशल व शिवांगीच्या अफेअरची चर्चा सर्वत्र सुरु होती. पण ते इतक्या लवकर लग्न करतील असे मात्र कोणालाही वाटलं नव्हतं. समोर आलेल्या फोटोमध्ये दोघांच्याही लग्नाची धामधूम बघायला मिळत आहे. यामध्ये शिवांगीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच कुशलने आयव्हरी रंगाची शेरवाणी परिधान केली आहे.
तसेच एका फोटोमध्ये हळदीचे फोटो समोर आले असून मॅचिंग पिवळ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहेत. तसेच त्यांच्या मेहंदीचे फोटो समोर आले असून शिवांगीच्या हातावर सुंदर अशी मेहंदी दिसून येत आहे. त्यामुळे हे सगळए फोटो बघून खरच त्यांचं लग्न पार पडलं असा समज चाहत्यांचा झाला. मात्र या फोटोंबद्दलचं सत्य समोर आलं आहे. दरम्यान समोर आलेले फोटो हे AI द्वारे तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता दोघांच्याही चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
काही दिवसांपूर्वी कुशल व शिवांगी यांना एकत्रित एका पार्टीमध्ये पाहिले गेले होते. या ठिकाणी ते मस्त डान्स करत होते. दोघांनीही मॅचिंग ड्रेस परिधान केला होता. एकेमकांबरोबर ते खूपच खुश दिसत होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.