सोनी टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरचरण सिंग सध्या चर्चेत आहेत. या शोमध्ये रोशन सोधीची भूमिका साकारणाऱ्या गुरचरण सिंहने काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये अभिनेत्याने खुलासा केला की त्याने २० दिवसांपासून अन्न आणि पाणी सोडले आहे. गुरुचरण सिंहची प्रकृती अचानक खालवली असल्याचे वृत्त नुकतंच समोर आले. यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. आता तिच्या मैत्रिणीची अवस्था पाहून टीव्ही अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालाने टेलि टॉकशी केलेल्या खास संवादात शोच्या निर्मात्यांना लक्ष्य केले आहे. (jennifer mistry angry on gurucharan singh)
अभिनेत्री म्हणाली, “ते लोक म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते कुणाचेही नाहीत. त्यांनी जर माझ्या बाबतीत बाजू घेतली नाही, तर ते त्याच्या (गुरचरण सिंग)साठी काय करणार? गेल्या वर्षी माझी बहीण वारली तेव्हा मला कोणी फोनही केला नाही. ते गुरचरणलाही कधीही मदत करणार नाहीत” यासोबतच जेनिफरने सांगितले की, तिने गुरचरणला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता पण तो नंबर बंद असल्याचे सांगण्यात आले.
आणखी वाचा – मध्या-अभ्याला शाळेतून काढणार का?, ‘दहावी-अ’च्या वर्गात मोठा निर्णय होणार, नक्की काय असणार पुढचं पाऊल?
यापुढे जेनिफरने तिचा मित्र गुरचरण सिंगच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. तसंच संवादादरम्यान, अभिनेत्रीने हे देखील उघड केले की, गुरचरणने तिच्याकडे एक लाख रुपयांचे कर्ज मागितले होते, परंतु अभिनेत्याने पैसे घेण्यास नकार दिला. काही काळानंतर गुरचरणने पुन्हा जेनिफरकडून १७ लाख रुपयांचे कर्ज मागितले. पण काही कारणास्तव अभिनेत्री ते देऊ शकली नाही. गुरुचरण सिंहची प्रकृती अचानक खालवली असल्याचे वृत्त नुकतंच समोर आले. यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत.
आणखी वाचा – ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर टिकू तलसानियांची तब्येत कशी? लेकीने दिली मोठी माहिती, म्हणाली, “माझे पप्पा…”
गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. गेल्या १९ दिवसांपासून त्याने खाणं-पिणं सोडून दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती भक्तीने दिली. दरम्यान, असित सित मोदी गुरुचरण सिंह यांच्याबद्दल खुलासा केला होता की, “गुरुचरणने स्वतःहून शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. आम्ही त्याला कधीही शो सोडण्यास सांगितले नाही”.