शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navra Maaza Navsacha 2 चित्रपट ओटीटीवर दाखल, सचिन पिळगांवकरांनी दिली माहिती, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 9, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navra Maaza Navsacha 2 movie is released on Amazon Prime and is also in theatres.

Navra Maaza Navsacha 2 चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहातदेखील सुरू आहे

मराठी चित्रपटसृष्टीमधील गाजलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. तब्बल २० वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ २० सप्टेंबरला प्रदर्शित झाला. दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी होता १००० पेक्षा अधिक शोजने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६०० पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. (Navra Maaza Navsacha 2 on OTT)

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.८६ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.४३ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३.५५ कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदोड पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. काही दिवसांपूर्वी ब्लॉकबस्टर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची सक्सेस पार्टी पार पडली. या सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटातील कलाकार मंडळींसह इतर कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. अशातच आता बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : पहिल्या पाडव्याला लीलाने ऐजेसाठी आणलं खास गिफ्ट, खास भेटवस्तूचा अर्थही समजावून सांगितला, प्रेमाला नवी दिशा मिळणार

यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच पोस्ट केली आहे. “आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहातदेखील सुरू आहे”, असं सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या या पोस्टमधून सांगितलं आहे. त्यामुळे आता ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट बघितला नसेल त्यांना हा घरबसल्याही हा चित्रपट पाहता येणार आहे. तसंच ज्यांना चित्रपटगृहात जाऊन बघायची इच्छा आहे ते अजूनही चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकतात.

आणखी वाचा – कंगणा रनौतच्या आजीचे निधन, १०० हून अधिक होतं वय, अभिनेत्रीने लिहिली भावुक पोस्ट, म्हणाली, “तिचे आरोग्य…”

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, विजय पाटकर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळाली. या चित्रपटाची नवसाची गोष्ट कोकण रेल्वे प्रवासात घडली आहे. एका वेगळ्या नवसाची गोष्ट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. 

Tags: Navra Maaza Navsacha 2Navra Maaza Navsacha 2 on OTTNavra Maaza Navsacha 2 On OTT News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Darshana Vengurlekar's Annapurna, a 20-year-old small restaurant in Mumbai's Dadar

छोट्या खानावळीत फक्त ९० रुपयांना नॉनव्हेज थाळी देणारी अन्नपूर्णा, घरगुती जेवणासाठी लोक लावतात रांग, तुम्हीही घेऊ शकता आस्वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.