बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे. तिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कंगनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कंगनाची आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले आहे. १०० पेक्षा अधिक वर्षांच्या त्या होत्या. शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले असून कंगनाने आजीच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. तसेच काही फोटोदेखील शेअर केले आहेत. ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.कंगनाची पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच कंगनाच्या आजीसाठी भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. (kangana ranaut grandmother death)
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आजी इंद्राणीबरोबर बसलेली दिसून येत आहे. तसेच यामध्ये दोघीही हसताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये आजी झोपलेली दिसत आहे आणि आजीच्या डोक्यावर डोक ठेऊन ती निराशदेखील दिसत आहे. कंगनाने हे फोटो शेअर करत तिच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले की, “काल रात्री माझी आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबं दु:खात आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा”.
पुढे तिने लिहिले की, “माझी आजी एक सर्वसाधारण महिला होती. त्यांची पाच मुलं होती. माझ्या आजी आजोबांनी त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण दिले. तसेच लग्न झालेल्या मुलीदेखील शिकतील व करियर करतील याकडे लक्ष दिले. त्यांना मुलांच्या करियरवर अभिमान होता”.
पुढे तिने लिहिले की, “आम्ही आमच्या आजीचे खूप आभार मानतो. आजीची ऊंची ५ फुट ८ इंच इतकी होती. मला त्यांची ऊंची, आरोग्य व पचनशक्ती वारसाने मिळाली. माझ्या आजीचे वय १०० पेक्षा अधिक होते तरीही स्वतःचे सगळे काम ती स्वतःच करायची. आमची आजी नेहमीच आमच्या डीएनए व आमच्यामध्ये नेहमी दिसेल” दरम्यान आता कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच कंगनादेखील सगळेजण धीर देत आहेत.