बॉलिवूड परफेक्शनिस्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अशातच ३१ वर्ष जुना त्याचा एक किस्सा बऱ्याच वर्षांनी समोर आला आहे. हा किस्सा आहे आमिर खान व अभिनेत्री नवनीत निशान यांचा. अभिनेत्री नवनीत निशान सह-कलाकार आमिर खानच्या विनंतीवरुन त्याला दिवसभर किस करत राहिली. खुद्द अभिनेत्रीनेच याबाबतचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला होता. नवनीत निशानने आमिरबरोबर ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात काम केले होते. याआधी ती त्याच्यासह १९९३मध्ये आलेल्या ‘हम हैं राही प्यार के’ चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी आमिरने नवनीतला पुन्हा पुन्हा किस करत राहण्यास सांगितले होते. (Aamir Khan And Navneet Nishan Incident)
‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटात आमिर खान व जुही चावला मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह मानसन्मानही मिळाला. ‘हम हैं राही प्यार के’ हा हॉलिवूड चित्रपट ‘हाऊस बोट’चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. ‘हम हैं राही प्यार के’ चित्रपटात नवनीत निशानने माया ही भूमिका साकारली होती, जी आमिरच्या व्यक्तिरेखेसह म्हणजेच राहुलबरोबर लग्न करु इच्छित होती. नवनीतने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटात एक सीन आहे, ज्यात ती आमिरच्या म्हणजेच राहुलच्या घरी जाते. चित्रपटातील हा सीन तिच्या व आमिरच्या साखरपुड्यानंतरचा होता. नवनीतच्या मते, आमिर खूप खोडकर होता. सीनमध्ये जेव्हा ती आमिरला त्याच्या घरातून घेऊन जाते तेव्हा ती त्याच्या गालावर किस करते. त्याच्या गालावर लिपस्टिकची खूण होती.
या सीननंतर आमिरने नवनीत निशानला वारंवार त्याला किस करायला सांगितले. “हे सातत्याने व्हायला हवे”, असं तो म्हणाला. नवनीत निशानच्या मते, या चित्रपटात आमिर खान व जुही चावलासारखे मोठे स्टार होते. या कलाकारांसह काम करण्याचं नवनीतला दडपण आलं होतं, पण सगळ्यांनीच अभिनेत्रीला खूप सपोर्ट केला. नवनीत निशानने सांगितले की, नंतर ती घरी आली आणि तिने तिच्या मित्रांना सांगितले की, तिने दिवसभर आमिर खानला किस केले.
या चित्रपटात आणखी एक सीन होता, ज्यात नवनीत निशानला अंडी फेकून मारहाण केली होती. जेव्हा तिचे माया हे पात्र आमिरच्या पात्राशी म्हणजेच राहुलशी लग्न करायला जाते, तेव्हा जुही चावला (वैजयंती) तिथे पोहोचते. यावेळी आमिर व नवनीत निशानवर लहान मुले अंडी फेकतात. नवनीतच्या म्हणण्यानुसार, अंडी जोरात लागणार होते, त्यामुळे आमिरने काळजी घेतली की, अंडी आधीच थोडी तडतडली आहेत, जेणेकरून ती आपल्यावर आपटल्यावर दुखापत होणार नाही.