लोकप्रिय मालिकांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका होय. मालिका जेव्हा पासून सुरु झाली आहे तेव्हापासूनच या मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेतील राघव व आनंदीची जोडी तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. गावाकडून मुंबईत येऊन आनंदीने कसा आपला संसार संभाळला, कशी माणसं जोडली आहे, हे पाहणं मालिकेत रंजक ठरतंय. (Varsha Dandle On Nava Gadi Nava Rajya)
तसेच मालिकेत आलेल्या अनेक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मध्यंतरी राघव व आनंदी यांच्या नात्यात दुरावा आला होता त्यावेळी राघव व आनंदी आता पुन्हा एकत्र कधी येणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. त्यांनतर राघवने आनंदीला बायको म्हणून स्वीकारले. आणि आता त्यांचा सुरळीत संसार सुरु असलेला पाहायला मिळतोय. अशातच आता नवा गाडी नवं राज्य या मालिकेची काही दिवसांसाठी वेळ बदलली असल्याचं समोर आलं आहे, दरम्यान अनेकांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा अनुमान काढला आहे.
य मालिकेतील एक उत्साही कलाकार म्हणजे अभिनेत्री वर्षा दांदळे. मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना नेहमीच पसंतीस पडते. शिवाय वर्षा ही सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती व्हिडीओ, फनी रील्स शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच या अभिनेत्रीने मालिका बंद होणार का या प्रश्नावर उत्तर दिल आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे. २५ सप्टेंबरपासून हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलं आहे. या वेळेत ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका आधी प्रक्षेपित केली जात होती. आता नवा गडी नवं राज्य ही मालिका रात्री ८.३०वाजता प्रक्षेपित होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना ही मालिका बंद होणार का? असा प्रश्न सतावत आहे.

चाहत्यांच्या या प्रश्नावर आता वर्षा दांदळेने पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्री वर्षा दांदळेच्या एका व्हिडिओवर एका चाहत्याने ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका बंद होणार आहे का? कारण टीव्हीवर २५ सप्टेंबरपासून ९ वाजता प्रदर्शित होणार आहे” असे दाखवत आहे असा प्रश्न विचारला आहे. त्यावर वर्षा दांदळे यांनी “ही मालिका बंद होत नाही. ८.३० वाजता या नव्या वेळेत दाखवली जाणार आहे”, असं उत्तर चाहत्याला देत त्यांच्या प्रश्नच निरसन केलं आहे.