बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या पप्पांनी गणपती आणला…” या ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, ठेका धरत म्हणाले, “आमच्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 18, 2023 | 3:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Narkar Couple Dance On Trending Song

"आमच्या पप्पांनी गणपती आणला…" या ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, ठेका धरत म्हणाले, "आमच्या झीनं.."

पन्नाशी ओलांडलेल्या मात्र तरुणाईला लाजवेल अशा कलाकारांच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ट्रेंडिंग रील्स, योगा, व्यायाम, अनेक विनोदी व्हिडीओ बनवण्यात या जोडीचा हातखंडा आहे. या वयात या जोडीला नाचताना पाहून नेटकरी त्यांना ट्रोल करतात, तर अनेकांना त्यांची या वयातील एनर्जी आवडते व ते कौतुकही करतात. बरेचदा ही जोडी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. आता पुन्हा एकदा ही जोडी एका ट्रेंडिंग गाण्यावर रील केल्याने चर्चेत आली आहे. (Narkar Couple Dance On Trending Song)

मागील काही दिवसांपसून ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे. एका लहानग्याने गायलेलं व अभिनित हे गाणं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. या गाण्यावर अनेक प्रेक्षकांनी रील करून सोशल मीडियावर पोस्ट देखील केल्या आहेत. आता या ट्रेंडिंग गाण्याचं नवीन व्हर्जन नारकर कपल घेऊन आले आहेत. त्यांच्या या नवीन व्हर्जन वरील डान्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – अमेरिकेतल्या चाहत्यांची संकर्षण कऱ्हाडेने केली मागणी पूर्ण, सादर केली खास कविता, म्हणाला, “भ्रष्टाचार पुन्हा…”

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ गाण्याचं नवीन व्हर्जन अविनाश व ऐश्वर्या नारकर यांनी तयार केलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनी सध्या ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’ हा गणेशोत्सवानिमित्त खास सोहळा साजरा करण्यात व्यस्त आहेत. हा सोहळा आज प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर पाहायला ही मिळणार आहे. या सोहळ्यावेळी गणेशोस्तवाचे औचित्य साधत अविनाश व ऐश्वर्या नारकर यांनी ‘आमच्या झीनं गणपती आणला’ असं गाणं तयार करून व्हिडीओ केला आहे. ‘इट्स मज्जा’ या इन्स्टाग्राम पेजवर त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला असून अनेक चाहत्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहे.

आणखी वाचा – अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक गाजवणार रंगमंच, ‘या’ नाटकानिमित्त पहिल्यांदाच एकत्र

अविनाश नारकर सध्या ‘३६ गुणी जोडी’ व ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ग्रे शेड असलेली भूमिका साकारत आहेत.

Tags: aishwarya narkaravinash narkarentertainmentzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Vishakha Subhedar On Obesity

“कोणाची कशी मारायची हे…”, जाडेपणावर होणाऱ्या विनोदावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “राग येतो कारण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.