मराठी मालिकांच्या यादीत अग्रेसर असलेली आणि अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘ठरलं तर मग’ मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना दिसते. मालिकेतील सायली अर्जुनची जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. मालिकेतील सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसतेय तर अर्जुनची भूमिका अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे. सायली व अर्जुनच्या खोट्या लग्नापासून सुरुवात झालेली ही गोष्ट सध्या मोठ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. (Tharal Tar Mag On Ganeshotsav)
लवकरचं सर्वत्र लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे त्या निमित्त सगळीकडे जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर देखील बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्या संदर्भात एक व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओ मध्ये सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी मोदक बनवताना दिसत आहे तसेच मालिकेतील इतर मंडळी देखील सजावटीची तयारी करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर सगळेजण मोदक बनवताना दिसत आहेत. फक्त कलाकार मंडळीच नव्हे तर इतर क्रू मेम्बर्सही कलाकारांबरोबर गणेशोत्सवाची तयारी करण्यात व्यस्त आहेत. फुलांच्या माळांनी सेट सजवण्यात आलेला दिसतोय. सेटवर सगळ्यांचीच गणेशाच्या आगमनासाठी धावपळ सुरु असलेली पाहायला मिळतेय.
सायली आणि अर्जुनच्या खोट्या लग्नापासून सुरुवात झालेली ही गोष्ट सध्या मोठ्या वळणावर येऊन पोहचली आहे.सायली आणि अर्जुनच्या नात्याला नवीन नाव मिळणार असल्याची चिन्ह मालिकेच्या प्रोमोवरून दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी दहीहंडीच्या विशेष भागात सायली अर्जुन मध्ये प्रेम बहरताना प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. सायली अर्जुनच्या खोट्या प्रेमकहाणीचं रूपांतर खऱ्या प्रेमात होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेने ‘स्टार प्रवाह’ वरील प्रसिद्ध मालिकांना देखील टीआरपीच्या शर्यतीत मागे सारत पहिल्या क्रमांकावर आपलं नाव कोरलं आहे.