शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘नवा गडी नवं राज्य’ मलिका बंद होणार असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “आता ही मालिका…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 18, 2023 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Varsha Dandle On Nava Gadi Nava Rajya

'नवा गडी नवं राज्य' मलिका बंद होणार असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "आता ही मालिका…"

लोकप्रिय मालिकांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका होय. मालिका जेव्हा पासून सुरु झाली आहे तेव्हापासूनच या मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेतील राघव व आनंदीची जोडी तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. गावाकडून मुंबईत येऊन आनंदीने कसा आपला संसार संभाळला, कशी माणसं जोडली आहे, हे पाहणं मालिकेत रंजक ठरतंय. (Varsha Dandle On Nava Gadi Nava Rajya)

तसेच मालिकेत आलेल्या अनेक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मध्यंतरी राघव व आनंदी यांच्या नात्यात दुरावा आला होता त्यावेळी राघव व आनंदी आता पुन्हा एकत्र कधी येणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. त्यांनतर राघवने आनंदीला बायको म्हणून स्वीकारले. आणि आता त्यांचा सुरळीत संसार सुरु असलेला पाहायला मिळतोय. अशातच आता नवा गाडी नवं राज्य या मालिकेची काही दिवसांसाठी वेळ बदलली असल्याचं समोर आलं आहे, दरम्यान अनेकांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा अनुमान काढला आहे.

आणखी वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला…” या ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, ठेका धरत म्हणाले, “आमच्या…”

य मालिकेतील एक उत्साही कलाकार म्हणजे अभिनेत्री वर्षा दांदळे. मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना नेहमीच पसंतीस पडते. शिवाय वर्षा ही सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती व्हिडीओ, फनी रील्स शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच या अभिनेत्रीने मालिका बंद होणार का या प्रश्नावर उत्तर दिल आहे.

View this post on Instagram

A post shared by Varsha Dandale (@varshadandale)

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे. २५ सप्टेंबरपासून हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलं आहे. या वेळेत ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका आधी प्रक्षेपित केली जात होती. आता नवा गडी नवं राज्य ही मालिका रात्री ८.३०वाजता प्रक्षेपित होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना ही मालिका बंद होणार का? असा प्रश्न सतावत आहे.

आणखी वाचा – Video : बाप्पाच्या आगमनासाठी ‘ठरलं तर मग’च्या संपूर्ण टीमची जोरदार तयारी, जुईने बनवले खास मोदक

चाहत्यांच्या या प्रश्नावर आता वर्षा दांदळेने पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्री वर्षा दांदळेच्या एका व्हिडिओवर एका चाहत्याने ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका बंद होणार आहे का? कारण टीव्हीवर २५ सप्टेंबरपासून ९ वाजता प्रदर्शित होणार आहे” असे दाखवत आहे असा प्रश्न विचारला आहे. त्यावर वर्षा दांदळे यांनी “ही मालिका बंद होत नाही. ८.३० वाजता या नव्या वेळेत दाखवली जाणार आहे”, असं उत्तर चाहत्याला देत त्यांच्या प्रश्नच निरसन केलं आहे.

Tags: entertainmentnava gadi nav rajyavarsha dandle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Prasad Khandekar new film Announced

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ओंकार भोजनेसह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार दिसणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.