सध्याच्या चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे नवा गडी नवं राज्य. मालिकेचं कथानक वेगळं असल्यामुळे सुरवाती पासून या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होत. राघव,आनंदी,रमा या पात्रांभोवती ही मालिका फिरते. रमाच्या कुटुंबाला आपलस करून स्वतःचा संसार उभा करण्याचं प्रयत्न आनंदी करतेय. हळू हळू सर्वानी आनंदीचा स्वीकार केला आहे.आनंदी ही कुटुंबातल्या सर्वांचं सारे काही प्रेमाने करते.(Nava Gadi Nav Rajya)
आता पर्यंत आनंदी राघव च्या नात्याने बरेच चढ उतार पहिले आहेत. राघवने सुरुवातीला आनंदीला बायको म्हणून स्वीकारले नसले तरी कायम राघव आनंदीच्या पाठीशी उभा राहिला होता.राघवला आपलंस करण्यासाठी आनंदीने कायमच प्रयत्न केले आहेत. आणि तिच्या या प्रयत्नाना आता कुठे यश मिळाले होते. राघवने बायको म्हणून आनंदीचा स्वीकार केला होता.आनंदी आणि राघवच नातं फुलत होत. तसेच आनंदीच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन राघवने आनांदीला तिचा स्टुडिओ देखील सुरु करून दिला.
पहा काय घडले राघव आनंदी मध्ये ?
इतक्यातच राघवला आनंदी आणि रमाच सत्य कळालं तेव्हा पासून राघव रमा मध्ये इतका गुंतून गेला की त्यांचं आनंदीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. परंतु जेव्हा राघवला हे कळालं की रमा आनंदीला त्यांच्या लग्ना पासून दिसतेय,तेव्हा पासून गैरसमजांमुळे आनंदी आणि राघवच्या नात्यात वेगळाच दुरावा आला, दिवसेंदिवस हे वाद वाढतच जाताना पाहायला मिळत आहेत.सध्या राघवने आनंदी कडून तीच मंगळसूत्र काढून घेतलं आहे आणि त्या रागाने आनंदी घर सोडून गावी तिच्या आबांकडे गेली आहे. आनंदीला तिच्या माहेरी आणि राघवला त्याच्या घरी घरच्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता नाकीनव आले आहेत.(Nava Gadi Nav Rajya)
हे देखील पहा : सानिया चा ऑफस्क्रीन चांगुलपणा
शेवटी राघव चिडून घराबाहेर जातो. आणि त्याला आनंदीने आता पर्यंत त्याच्या साठी त्याच्या घरच्यान साठी जे काही केल ते सर्व आठवत. तर दुसरीकडे गावी नाना मुळे आनंदीच्या बाबांची तब्येत बिघडलेली असते आणि डॉक्टरने त्यांना टेन्शन येणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली आहे. आता पुढील भागात आबा राघव ला कॉल करणार आहेत तर राघव आबांना सर्व सांगेल का की राघव आनंदीला घरी परत आणणार? राघव आणि आनंदी मधले गैरसमज मिटतील का? हे बघणं रंजक ठरणार आहे.(Nava Gadi Nav Rajya)