भाग्य दिले तू मला या कलर्स मराठी वरील मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले आहेत.या मालीकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे आहे. जितकं प्रेम राज-कावेरीला मिळतंय तितकंच प्रेम मालिकेतील खलनायिकेला ही मिळतंय.प्रेक्षकांना खलनायिकांचा राग येणं हेच त्यांच्या कामाचे यश असते. या मालिकेतील खलनायिका सानिया म्हणजेच,जान्हवी किल्लेकर ही आपल्या कुरघोड्यानी राज कावेरीला त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न करते. कटकारस्थान करण्याची एक संधी सानिया सोडत नाही.(Jahnavi killekar Nilesh Ranade)
सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे, सानिया आणि वैदहीने मिळून राज कावेरीच्या परिस्थितीचा फायदा घेत रत्नमालाची संपत्ती स्वतःच्या नावावर केली आहे. परुंतु हे रत्नमालाला समजल्यावर तिने वैदहीला नोटीस पाठवून चांगलाच पलटवार केलाय. आणि या नोटीसचा जाब वैदही रत्नमालाला विचारते तेव्हा वैदही आणि सानिया चे रत्नमाला सोबत वाद होतात. आता सानिया आणि वैदही त्यांची पुढची खेळी काय खेळणार हे बघणं रंजक ठरणार आहे.
पहा सानिया आणि बच्चू मामाचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग
मालिकेतील बच्चू मामा म्हणजेच निलेश रानडे कायम राज कावेरीच्या पाठीशी असतात. तर मालिकेत बच्चू मामा आणि सानिया यांचं एमकमेकां सोबत अजिबात पटत नाही हे पाहायला मिळत. परंतु, पडद्या समोरील आणि पडद्या मागील कहाणी खूप वेगळी असते. मालिकांमध्ये एकमेकां विरोधात उभे असणारे कलाकार पडद्यामागे एमेकांसोबत कमाल बॉण्ड शेअर करतात.आणि त्यांच्या सेट वरील या गमती जमती हे कलाकार त्यांच्या सोशल मीडिया वरून शेअर करत असतात. अशीच एक स्टोरी जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलीय. त्यात ती आणि बच्चू मामांचे तिने दोन फोटोज शेर करून रील आणि रिअल लाईफ असं कॅप्शन दिलंय. या फोटोमधून त्यांचं ऑफ स्क्रीन बॉण्डिंग दिसून येतंय.(Jahnavi killekar Nilesh Ranade)

सानिया सेट वरील इतर कलाकारानं सोबत ही अनेक मजेशीर रील करून तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून बऱ्याचदा पोस्ट करत असते. आणि तिच्या या पोस्टना देखील प्रेक्षक भरपूर प्रेम देतात. कमेंट्स करतात. आणि कलाकारांची ही ऑफ स्क्रीन धमाल कायम प्रेक्षकांच्या पसंतीस पडते.या माध्यमातून कलाकार खऱ्या आयुष्यात जसे आहेत तसे देखील प्रेक्षकांपर्यंत पोहचतात.