सामान्य माणूस हा दिवसभराच्या परिश्रम नंतर आपल्या घरी जातो आणि मनोरंजन म्हणून टीव्ही पाहतो. टीव्ही वर लागणारे अनेक कार्यक्रम, चित्रपट, मालिका या सर्वांकडे एक मनोरंजनाचं साधन म्हणून आपण पाहतो. मनोरंजनाच्या याचं विश्वातील काही शो हिट ठरतात तर काही फ्लॉप. हिट ठरलेल्या मालिकांच्या यादीतील एक नाव म्हणजे कलर्स वाहिनी वरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे भाग्य दिले तू मला. मालिकेतील राज आणि कावेरीची भूमिका पार पाडणारे अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले या नव्याकोऱ्या जोडीने प्रेक्षकाना वेड लावलं आहे. या नव्या जोडीच्या सोबतीला साथ लाभली ते अनुभवी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची. ज्यांच्या अभिनयातील अनुभवाचा वापर पुरेपूर त्यांच्या अभिनयातून अनुभवता येतो. तर बऱ्याच संकटानंतर मालिकेमध्ये आता अखेर रत्नमाला या आजारातून बऱ्या होऊन घरी परतल्या पण माहेरचा चहा आणि आर्थिक अडचणींना राज कावेरी रत्नमाला यांना सामोरं जावं लागलं.(Ratnmala Kaveri’s New Plan)
वैदेही आणि सानिया यांच्या कात कारस्थानांना सुरुवातील राज कावेरी बळी पडल्याचं दिसलं पण जेव्हा पासून रत्नमाला यांनी स्वतः सानिया वैदही ला धडा शिकवण्याचं ठरवलं तेव्हापासून मालिकेत एक वेगळी चुरस पाहायला मिळत आहे. रट्टणम्ला यांच्या आजाराचा फायदा घेऊन सानियाने वैदेहीच्या साहाय्याने माहेरचा चहा हाडपला खरा पण रत्नमाला पुन्हा उभ्या राहिला मुले आता सानिया आणि वैदेही यांच्या अडचणीत वाढ होताना दोस्त आहे. रत्नमाला यांच्या बद्दल असलेल्या आदरामुळे माहेरच्या चहा मधील कामगारांनी काम करण्यास नकार दिला त्यामुळे सानिया रत्नमाला यांना माहेरचा चहा विकून टाकण्याची धमकी देते.
हे देखील वाचा – नाना पाटेकर हे नाव लागण्याआधी ‘हे’ होत नानांचं खरं नाव आजही शाळेतील मित्र या नावाने मारतात नानांना हाक
त्यावर रत्नमाला सानियाला खडेबोल सुनावतात आणि माहेरचा चहा विकू नकोस असं सांगतात. यावर कावेरी मी स्वतः कामगारांना समजावते ते काम सोडून जाणार नाहीत असं म्हणते आणि माहेरचा चहा मध्ये जाऊन सगळ्यांना काम बंद न करण्याचं कारण समजावून सांगते. तसेच सानिया आणि वैदेहीचा अपमान करत रत्नमाला लवकरच माहेरच्या चहा मध्ये परत येतील असं आश्वासन कामगारांना देते. हे ऐकून सानिया आणि वैदेहीच्या तळपायाची आग मस्तकात जाते.(Ratnmala Kaveri’s New Plan)
तर आता राज कावेरी आणि रत्नमाला सानिया वैदेहीला धडा शिकवून पुन्हा एकदा माहेरचा चहा आणि सर्व संपत्ती पुन्हा मिळवणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे