मॉडेल असलेल्या उर्वशीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॉडेलिंग बरोबरच तिने अभिनयामध्येही आपले नशीब आजमावले आहे. तिची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. अनेकदा ती अभिनय व मॉडेलिंग व्यतिरिक्त इतर काही कारणांमुळेही ती अधिक चर्चेत असते. सध्या ती तिच्या एका गाण्यामुळे चर्चेत आहे. सध्या तिचा आगामी ‘डाकू महाराज’ चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात उर्वशीबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण मुख्य भूमिकेत आहे. याच अभिनेत्याबरोबरचा उर्वशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Nandamuri Balakrishna trolled)
या व्हिडीओतील नंदमुरी बालकृष्ण यांची कृती पाहून चाहते त्यांच्यावर संतापले आहेत. उर्वशीने १३ जानेवारीला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये उर्वशी ‘डाकू महाराज’ चित्रपटातील सहकलाकार नंदमुरी बालकृष्णबरोबर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ‘डाकू महाराज’ चित्रपटाचं गाणं वाजत आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये नंदमुरी अचानक उर्वशीचा हात पकडून तिला वारंवार डान्स करण्यास भाग पाडतात.
आणखी वाचा – कथित घोटाळ्याप्रकरणी नेहा कक्करला अटक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?
अभिनेत्री यावेळी अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, “म्हातारा माणूस तरुणीला जबरदस्ती करत आहे”, तर आणखी एकाने “नाचत ते आहेत पण लाज मला येत आहेत”. तर दुसऱ्याने “हे अजिबात मजेदार नाही”. त्याचबरोबर आणखी एकाने या व्हिडीओला नापसंती दर्शवत “करिअरसाठी तरुणी सर्वस्वाचा त्याग करत आहे”.

आणखी वाचा – अक्षरा पुन्हा सासरी जाणार, अधिपतीबरोबर नव्याने संसार थाटताना भुवनेश्वरी अडथळा निर्माण करणार का?
दरम्यान, ‘डाकू महाराज’ या चित्रपटाने दोन दिवसांत चांगली कमाई केली आहे. त्यानंतर या चित्रपटाच्या यशाबद्दल खास सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या या पार्टीमध्ये उर्वशी रौतेलानेही हजेरी लावली. याच पार्टीत उर्वशीने नंदमुरी बालकृष्ण याच्याबरोबर डान्स करत होती, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि पाहता पाहता तो बराच व्हायरलही झाला. मात्र त्या व्हिडीओमध्ये, उर्वशी ही डान्स करताना बरीच अस्वस्थ दिसत होती.