‘इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी प्रत्येक भागासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असतात. आतापर्यंत आता या सीरिजचे एकूण तीन भाग आले आहेत. पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या भागात शाळेच्या संस्थेतील एक मुख्य व्यक्ती शाळेच्या पाहणीसाठी येतात आणि तेमुलांची तुकडीनुसार विभागणी करायला सांगतात. (Dahavi-A daily updates)
अशातच आता तिसऱ्या भागात या मुलांची विभागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या भागाच्या सुरुवातीला आभ्या व रेश्मा यांच्यात केवडावरुन वाद होतात. रेश्माने केवडाला वही न दिल्यामुळे तिला मार खावा लागल्याचे आभ्याला वाटते आणि यातून त्याचा गैरसमज होतो. पुढे शाळेत कुरकुटे सर मध्या, किरण्या व अन्य काही मुलांना दहावी-डमध्ये बसण्यास सांगतात. यातून शिक्षक व मुळे यांच्यात मतभेद होतात. यामुळे मुलं शिक्षकांवर रागावतात.
आणखी वाचा – कथित घोटाळ्याप्रकरणी नेहा कक्करला अटक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?
दहावी-ड मध्ये जाण्याचा निर्णय मुलांना आवडला नसून याबद्दल ते मुख्याध्यापकांकडे जातात आणि त्यांना हा निर्णय मन्या नसल्याचे सांगतात. मात्र हा निर्णय तुम्हाला मान्य करावाच लागेल असं मुख्याध्यापक मुलांना ठणकावतात. त्यामुळे चिडलेली मुलं शाळेतील वस्तूंचं नुकसान करतात आणि पळ काढतात. त्यानंतर कांबळे सर आणि इतर शिक्षककांमध्ये मुलांच्या या गैरवर्तणूकीबद्दल चर्चा होते. यात कांबळे सर मुलांच्या वागण्याबद्दल त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुख्याध्यापक त्यांचे काही ऐकत नाहीत.
आणखी वाचा – ‘पाताल लोक’ सीरिज फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
त्यामुळे आता पुढील भागात मध्या, आभ्या, विक्या, केवडा यांचं काय होणार? त्यांना दहावी-ड मध्येच बसावं लागणार का? यावर कांबळे सरांची काय भूमिका असणार? हे आगामी चौथ्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर केवडामुळे आभ्याला रेश्माविषयी झालेला गैरसमजही दूर होणार का? हे येत्या भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल.