‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही झी मराठीवरील मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील अक्षरा-अधिपती यांच्याशिवाय भुवनेश्वरीची भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अक्षरा आणि अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो. अक्षरा सुद्धा काहीही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मालिकेत अक्षराच्या गरोदर असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. (tula shikvin changlach dhada daily updates)
मालिकेत एकीकडे अक्षरा आई होणार आहे, तर दुसरीकडे त्यांचा अबोलाही पाहायला मिळत आहे. दोघांमधील या चुकीच्या संवादामुळे दोघांमधील गैरसमज आणखीनच वाढत आहेत. अशातच आता अक्षरा लवकरच तिच्या सासरी जाणार आहे. मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर अक्षरा सासरी जाण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता मालिकेच्या कथानकाला एक वेगळं वळण आलं आहे. आणि याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. झी मराठीने हा नवीन प्रोमो शेअर केला आहे.
आणखी वाचा – अर्जुन बिजलानीच्या आई रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार, तब्येत खालावल्यानंतर अभिनेता भावुक
या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा असं म्हणते की, “मी लवकरच घरी परत जाईन. तिळगूळ घेऊन जाईन. संक्रांतीच्या मुहूर्तावर मी आता त्या घरात जाईन”. यावर तिचे वडील “कशासाठी?” असं विचारतात. त्यानंतर अक्षरा त्यांना उत्तर देत म्हणते की, “अधिपतींना भेटण्यासाठी”. तर एकीकडे भुवनेश्वरी तिच्या बहिणीला मकरसंक्रांतीची तयारी करायला सांगत आहे. भोगीसाठी भाजी आणावी यंदा तीळाचे लाडू जरा जास्त आणावेत असंही सांगते.
त्यामुळे आता अधिपती व भुवनेश्वरीच्या अप्रत्यक्ष व अक्षरा घरात येणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. तसंच यामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्यातीळ नाते पुन्हा पूर्वपदावर येणार का?, मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अधिपती-अक्षरा हे दोघे आपापसातील मतभेद, भांडण विसरुन पुन्हा एकत्र येणार का? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.