बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कथित घोटाळ्याप्रकरणी नेहा कक्करला अटक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 15, 2025 | 10:33 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Neha Kakkar arrested for scam and the photo of her arrest is viral on social media But is this true Or not see the details

कथित घोटाळ्याप्रकरणी नेहा कक्करला अटक, व्हायरल फोटोमागचं नेमकं सत्य काय? जाणून घ्या...

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करने आजवर आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक हिंदी-पंजाबी गाण्यांना तिचा आवाज लाभला असून तिच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. आपल्या गायनाने व सुमधुर आवाजाने चर्चेत राहणारी नेहा कक्कर सध्या एका घोटाळ्याच्या अफवांमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेहाला अटक करण्यात आली आहे. गायिकेला ट्रेडिंग घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याचा दावा या व्हायरल फोटोंमधून केला जात आहे. नेहाला या घोटाळ्यात अटक झाल्याची अफवा समोर आल्यानंतर सिनेविश्वासह तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (neha kakkar arrested for scam)

नेहाचे हे फोटो एका लिंकसह व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये नेहाच्या नावाने ‘एमारल्डो’ची जाहिरात करणारी बनावट मुलाखत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये नेहा रडतेय आणि एक पोलीस इन्स्पेक्टर तिला खेचून नेताना दिसत आहे. या फोटोसह असेही म्हटले जातेय की, यानंचर नेहाची कारकीर्द संपणार आहे. पण हा व्हायरल फोटो खरा नसून खोटा आहे. नेहाचे हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आले असावेत आणि तिचा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही. नेहाचा हा फोटो बनावट असून एआय किंवा फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

आणखी वाचा – ‘पाताल लोक’ सीरिज फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

AI चा वापर करुन अनेकदा सेलिब्रिटींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी अमिताभ बच्चन,रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींची नावेही समोर आलेली, गुंतवणूक स्कॅम करणाऱ्या वेबसाइट्सकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी अशाप्रकारचे बड्या सेलिब्रिटींची नावे वापरली जातात. अशाच प्रकारे आता गायिका नेहा कक्करच्या फोटोचा वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – आई नाही पण मालिकेतील कलाकारांनीच थाटामाटात केलं डोहाळे जेवण ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीला अश्रू अनावर

दरम्यान, सुरुवातीला बघताच क्षणी नेहाबद्दल खरी वाटणारी ही गोष्ट मात्र पूर्णपणे खोटी आहे. या फोटोला कोणतेच तथ्य नाही. नेहाच्या या अटकेच्या व्हायरल फोटोमागचे सत्य असे आहे की, त्यात दिसणारी महिला दुसरी कोणीतरी आहे आणि नेहाचा चेहरा त्यावर मॉर्फ करण्यात आला आहे. एआय किंवा फोटोशॉपच्या मदतीने असे करता येणे सहज शक्य आहे.   

Tags: neha kakaar arrested for big scamneha kakkarneha kakkar arrestedneha kakkar arrested for scam
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Jailer 2 Announcement Teaser

जबरदस्त ॲक्शन, डायलॉग अन्…; ७४व्या वर्षीही ‘जेलर २’च्या टिझरमध्ये रजनीकांत यांचा डॅशिंग अंदाज, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.