सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rajat Bedi Marathi Movie

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

Rajat Bedi Marathi Movie : मराठी सिनेमांकडे हिंदी कलाकारांचा वाढता ओढा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय हिंदी कलाकाराचं नाव जोडलं जाणार आहे. हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास केलेले अभिनेता रजत बेदी आता मराठी सिनेमाशी जोडले गेले आहेत. रजत बेदी हे आगामी मराठी चित्रपट ‘बंधू’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बेदी कुटुंबाचा मराठी चित्रपटसृष्टीशी नवा ऋणानुबंध जुळला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बेदी कुटुंबाचा समृद्ध वारसा आता मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचे पुत्र आणि ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, पटकथाकार व दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचे नातू रजत बेदी मराठी चित्रपटसृष्टीत नवे पर्व सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘मधुमती’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, देवदास’, ‘एक चादर मैली सी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या लेखनातून राजिंदर सिंह बेदी यांनी हिंदी सिनेमाला समृद्ध केले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर नरेंद्र बेदी यांनी ‘बंधन’,‘जवानी दिवानी’, ‘खोटे सिक्के’, ‘बेनाम’, ‘रफू चक्कर’ आणि ‘सनम तेरी कसम’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, ‘बेनाम’ आणि ‘अदालत’ हे अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेले त्यांचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. या दोनही दिग्गजांचा कलावारसा पुढे नेत रजत बेदी आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांच्या या नव्या प्रवासाकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे, हा प्रवेश केवळ एका कलाकाराचा नसून चित्रपटसृष्टीची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या बेदी कुटुंबाच्या पुढच्या पिढीचा मराठी सिनेमाशी जोडला जाणारा नवा अध्याय ठरणार आहे. रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई, कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे.

आणखी वाचा – ‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

मॉडेलिंगपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रजत बेदी यांनी १९९४ मध्ये ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धा’ जिंकली. ‘२००१: दो हजार एक’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ‘कोई मिल गया’ मधील भूमिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. ‘जोडी नंबर १’, ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘रक्त’, ‘अक्सर’, ‘पार्टनर’ यांसह अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केलेल्य ‘Bads of Bollywood’ या सिरीजच्या माध्यमातून रजत बेदी यांनी अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅक केले असून, त्यांच्या या नव्या इनिंगची विशेष चर्चा झाली.

आणखी वाचा – निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही रजत बेदी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे ‘बंधू’चे प्रस्तुतकर्ते म्हणून त्यांचा सहभाग हा केवळ व्यावसायिक भागीदारी नसून, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रदीर्घ प्रवासातून मराठी सिनेमाला मिळणारा एक नवा हातभार मानला जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणाबद्दल रजत बेदी म्हणाले, ‘बेदी कुटुंबासाठी भारतीय चित्रपटसृष्टी ही केवळ एक इंडस्ट्री नाही, तर आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. माझ्या वडिलांपासून आणि आजोबांपासून मिळालेला हा वारसा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आता मराठी चित्रपटातून या प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. मराठी सिनेमा त्याच्या आशयासाठी आणि दर्जेदार कथांसाठी ओळखला जातो. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षक माझ्या या नव्या भूमिकेचं आणि या चित्रपटाचं नक्कीच प्रेमाने स्वागत करतील, अशी आशा आहे.’ बेदी कुटुंबाची चित्रपटसृष्टीतील परंपरा आणि रजत बेदी यांचा प्रदीर्घ अनुभव यामुळे त्यांच्या मराठी पदार्पणाकडे आता विशेष उत्सुकतेने पाहिलं जात आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.