सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nikki Arbaaz breakup news

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्...; पोस्टमुळे चर्चांना उधाण

Nikki Arbaaz breakup news : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक स्पर्धकांची जवळीक पाहायला मिळाली. यांत निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल ही दोन नावे नेहमीच चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्यांच्यात प्रेमाचे नाते तयार झाले आणि ‘बिग बॉस’संपल्यावरही ही जोडी बरेचदा एकत्र पाहायला मिळाली. अभिनेत्री निक्की आणि अरबाज यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

या चर्चांदरम्यान निक्कीने केलेली एक पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे. “अफेअर्स केवळ एखादी नवीन व्यक्ती खूप आकर्षक असते म्हणून होत नाहीत; तर ते तेव्हा होते जेव्हा भूतकाळातील एखादी व्यक्ती दिलेली वचने पाळणे थांबवते”, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टचा संदर्भ नेमका कोणाकडे आहे, याबाबत निक्कीने कोणतंही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही.

आणखी वाचा – कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

दुसरीकडे, अरबाजनेही सोशल मीडियावर फसवणुकीबाबत भाष्य करणारी पोस्ट शेअर केली आहे. “आपल्या जोडीदाराची फसवणूक करणे आणि त्यानंतर घरी येऊन त्याच्या डोळ्यात पाहून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो/करते’ असे म्हणणे हा अनादराचा एक वेगळाच आणि अत्यंत खालच्या पातळीचा प्रकार आहे. जे म्हणायचे होते, ते मी स्पष्टपणे म्हटले आहे,” असं म्हणत त्याने एकप्रकारे निक्कीच्या पोस्टला उत्तर दिले आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

दोघांच्या पोस्टचा काळ आणि त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची बाब पाहता, त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर आला आहे. मात्र, या पोस्टमधून दोघांनीही एकमेकांवर थेट आरोप केले आहेत, असं स्पष्टपणे म्हणता येत नाही. निक्की आणि अरबाज यांचं ब्रेकअप नेमकं कशामुळे झालं, याबाबत दोघांकडूनही अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे सुरू असलेल्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे त्यांच्या अधिकृत वक्तव्यानंतरच स्पष्ट होईल.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.