शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमेय वाघ आणि नागराज मंजुळे यांचा नवीन चित्रपट

Darshana Shingadeby Darshana Shingade
एप्रिल 5, 2023 | 1:17 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Nagraj Manjule Amey Wagh

Nagraj Manjule Amey Wagh

सिनेसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रात आघाडीने घेतेले जाणारे नाव म्हणजे नागराज मंजुळे. सिनेमाचं वेड नागराज मंजुळेना शांत बसू देतं नाही.म्हणूनच एकामागोमाग एक असे दमदार चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतात.असे असले तरी हा प्रवास त्यांच्या साठी सोप्पा नव्हता. या सगळ्या वर मात करत ते जास्तीत जास्त उत्तम काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.(Nagraj Manjule Amey Wagh)

फॅन्ड्री या चित्रपटानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. फॅन्ड्री नंतर त्यांच्या सैराट या चित्रपटाने तर महाराष्ट्राला वेड लावले. झिंग झिंग झिंगाट वर ताल धरून नाचायला लावले. सैराट नंतर नाळ हा सिनेमा त्यांनी केला, त्यात त्यांनी अभिनयही केला होता.मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतही झुंड या चित्रपटातून बिग बिन सोबत त्यांनी त्यांच्या कामाची छाप पाडली. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून ते वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतात.आणि त्यांनी आपल्या चित्रपटातून अनेक नवीन मराठी कलाकार सिनेसृष्टीला दिले आहेत.हेच कलाकार त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले.

पहा नागराज मंजुळे यांचा नवीन चित्रपट कोणता आहे ?

या भरघोस यशा नंतर ते थांबलेले नाहीत घर, बंदूक, बिर्याणी हा त्यांचा नवा कोरा चित्रपट आकाश ठोसर आणि सायली पाटील या जोडी सोबत ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत नागराज मंजुळेंनी त्यांच्या घर बंदूक बिर्याणी या चित्रपटानंतर येणाऱ्या चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे.त्यावेळी ते असे म्हणाले, मी लवकरच अजून एका चित्रपटात झळकणार असून, ‘फ्रेम’ असे या चित्रपटाचे नाव आहे.या चित्रपटात मी आणि अमेय वाघ एकत्र झळकणार आहोत. झुंड नंतर घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात नागराज मंजुळे अभिनय करताना पाहायला मिळणार आहेत. याच मुलाखतीत त्यांनी असे ही म्हंटले आहे की, अभिनया पेक्षा ते दिग्दर्शन आणि निर्मिती मध्ये जास्त रमतात. आणि त्यांच्या या नवीन बातमीमुळे आनंद द्विगुणित झाला आहे. तर अमेय वाघ आणि नागराज मंजुळे यांना एकत्र स्क्रीन वर बघण्या साठी सर्वच उत्सुक आहेत.(Nagraj Manjule Amey Wagh)

हे देखील पहा: “एवढा मेकअपकरून पण काळी दिसतेस” मेकअपवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने सुनावले खडेबोल

नागराज मंजुळे कायम त्यांच्या कामाच्या, विषयाच्या आणि मांडणीच्या वेगळेपणा मुळे चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात की, आता नवीन काय पाहायला मिळणार.आणि प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला नागराज कायम न्याय देतात. आणि म्हणून त्यांचा आता पर्यंतचा प्रत्येक सिनेमा हा यशस्वी ठरला आहे.

Tags: actingAmey Waghdirectorentertainmentghar banduk biryaniits majjamarathi actormarathi movienaalnagraj manjulenew filmsaiarat
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Anagha Atul And Rutuja Bagwe

जेव्हा ऋतुजा-अनघाचं योगा आसन फसतं...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.