रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’ मध्ये मोठा ट्विस्ट, मुन्नवर फारुकीच्या एक्स गर्लफ्रेंडची शोमध्ये एण्ट्री, म्हणाली, “त्याने गुन्हा केला अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 16, 2023 | 4:33 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
munawar faruqui rumoured ex girlfriend ayesha khan wild card entry in bigg boss 17

‘बिग बॉस १७’ मध्ये मोठा ट्विस्ट, मुन्नवर फारुकीच्या एक्स गर्लफ्रेंडची शोमध्ये एण्ट्री, म्हणाली, "त्याने गुन्हा केला अन्..."

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक व गंमतीदार होत चालला आहे. या शोमधून आतापर्यंत सना रईस खान, सनी आर्या, जिग्ना व्होरा, नावेद सोल, मनस्वी व सोनाली बन्सल हे सहा स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. या शो मध्ये येणारे नवनवीन ट्विस्टस या शोची चाहत्यांमधील उत्कंठा शिगेला नेत आहेत. अशातच आता या शोमध्ये पुन्हा एकदा एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मुन्नवरची एक्स-गर्लफ्रेंड या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येणार आहे. (Bigg Boss 17 New Promo)

या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला असून यात आयेशा खानची घरात एण्ट्री होणार असल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये ती असं म्हणते की, “सर्वजण तिला आयेशा खान म्हणून ओळखतात आणि मुन्नवर फारुकीबरोबर तिचा जुना इतिहास आहे. मुन्नवर या घरात जसा वागतो तसा तो अजिबात नाही. मला तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न केलं पाहिजे असं तो म्हणाला होता. चुकांना माफी असते. पण गुन्ह्याला माफी नसते. त्याने जे काही केलं आहे तो एक गुन्हा आहे. मी जेव्हा या शो मध्ये जाईन तेव्हा त्याने माझी माफी मागावी अशी माझी इच्छा आहे.” 

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

आणखी वाचा – Majjacha Adda : “विनोदी नाटक असूनही कोणीच हसलं नाही अन्…”, अशोक सराफ यांनी सांगितला भन्नाट किस्सा, म्हणाले, “गुंड किंवा मोठा दादा…”

एका मुलाखतीत आयेशाने “‘बिग बॉस’मधील एका स्पर्धकाने मला संगीत व्हिडीओ बनवण्यासाठी फोन केला होता. पण तो व्हिडीओ येणार नाही हे मला माहिती होते. यानंतर तो माझ्यावर प्रेम करु लागला आणि मलाही तो आवडू लागला. यानंतर आम्ही रिलेशनमध्ये होतो. आमच्या रिलेशनआधी तो आणखी एका रिलेशनमध्ये असल्याचे मला माहीत होते. पण त्याने मला त्याचं ३-४ महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाले असल्याचे सांगितले आणि मीही त्यावर विश्वास ठेवला.” या संपूर्ण मुलाखतीत तिने मुन्नवरचे नाव घेतले नाही. पण ती मुन्नवरबद्दलच बोलत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

आणखी वाचा – “हे होणार होतंच….” मराठी अभिनेत्याने सांगितला बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या भेटीचा ‘तो’ किस्सा, म्हणाले, “अचानक एकदा रात्री…”

दरम्यान, त्यांच्यात खरंच काही नाते आहे का? तिच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे? आणि ‘बिग बॉस’मध्ये आल्यावर त्यांच्यात काही संघर्ष निर्माण होणार का? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच या नवीन प्रोमोखाली मुन्नवरच्‍या समर्थनार्थ त्‍याच्‍या चाहत्‍यांनी आयेशा खानला ट्रोल केले आहे आणि ‘बिग बॉस १७’ मध्ये प्रवेश ती फक्त स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठीच प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे.

Tags: bigg bossbigg boss 17bollywood newsentertainmententertainment newsMunawar Faruqui
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
shreyas talpade is recovering updates given by the actor's family members

श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, तब्बल ४८ तासांनी अभिनेत्याने प्रतिसाद दिला अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.