मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, केक कापला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2024 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Munawar Faruqui celebrated his birthday After won Bigg Boss 17 video viral on social media

Video : ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, केक कापला अन्...; व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७व्या पर्वाचा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला अन् डोंगरीच्या मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’च्या विजेतेपदाचा मान पटकावला. ‘बिग बॉस १७’च्या विजेत्याला म्हणजेच मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस’च्या आकर्षक ट्रॉफीसह रोख रक्कम ५० लाख रुपये व एक अलिशान कारही बक्षीस म्हणून मिळाली आहे. 

‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वरच होणार याचा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता आणि अखेर चाहत्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे मुनव्वरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच अभिनेत्याचा काल (२८ जानेवारी) रोजी वाढदिवस होता आणि त्याला ‘बिग बॉस’चे विजेतेपद, आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कमेच्या स्वरुपात वाढदिवसाचे खास बक्षीसही मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या पुढच्या सीझनमध्ये येणार अंकिताची सासू?, खुद्द सलमान खाननेचं केला खुलासा, म्हणाला, “तुम्ही जर…”

घरातून बाहेर येताच मुनव्वरने पापाराझींबरोबर त्याचा वाढदिवस साजरा केला. पापाराझींनी त्याच्या वाढदिवसानिमित्त खास केक आणला होता. तो केक कापत मुनव्वरने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याचा हा केक कापतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे घराबाहेर पडताच अमृता खानविलकरला झालं दु:ख, मैत्रिणीसाठी खास पोस्ट शेअर करत म्हणाली…

दरम्यान, या व्हिडीओखाली मुनव्वरच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसानिमित्त व ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानिमित्त कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याचे अनेक चाहते कमेंट्समध्ये मुनव्वरचे कौतुकही करत आहेत.  

Tags: bigg boss 17bigg boss 17 newsbigg boss 17 winnerBigg Boss 17 Winner NewsBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsMunawar FaruquiMunawar Faruqui Birthdayबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबिग बॉस १७ विजेताबिग बॉस १७ विजेता बातमीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमुनव्वर फारुकीमुनव्वर फारुकी वाढदिवस
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
alia bhatt and ranbir Kapoor won the best actor and actress 69th filmfare awards check full winners list see the details

Filmfare Awards 2024 Winner : आलिया-रणबीर ठरले यंदाच्या 'फिल्मफेअर'चे मानकरी, तर ’12th Fail’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.