शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये झाले दोन गट, रोहित शर्मा व हार्दिक पांड्यामध्ये वादाचं वादळ, कॅप्टन्सी चुकीची असल्याच्या टीका अन्…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 28, 2024 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Mumbai Indians team is divided into two groups of Hardik Pandya and Rohit Sharma see the details

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये झाले दोन गट, रोहित शर्मा व हार्दिक पांड्यामध्ये वादाचं वादळ, कॅप्टन्सी चुकीची असल्याच्या टीका अन्...

क्रिकेट विश्वातील सर्वांचा आवडता हंगाम म्हणजे आयपीएलचा हंगाम. अनेक क्रिकेटप्रेमी क्रिकेटच्या या आयपीएल हंगामासाठी आतुर असतात. अशातच नुकतीच ‘आयपीएल २०२४’ सुरु झाली असून यंदाच्या आयपीएल हंगामाबद्दल अनेक चर्चा होताना दिसून येत आहे. यात मुख्यत्वे हार्दिक पांड्या व रोहित शर्मा यांच्या नावाच्या चर्चांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

‘मुंबई इंडियन्स’ने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे. मात्र हार्दिकच्या कर्णधारपदाने संघातील वातावरण पूर्वीसारखे खेळीमेळीचे राहिले नसल्याचे दिसून येत आहे. त्याची रणनीती सपशेल अपयशी ठरत आहे. ‘मुंबई इंडियन्स’ने आतापर्यंत झालेले सलग दोन्ही सामने गमावले आहेत. विशेषत: माजी कर्णधार रोहित शर्माबरोबरचे त्याचे संबंध अजिबात सौहार्दपूर्वक नसून एकाच संघात गटबाजी दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

आणखी वाचा – लेकीसह भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये राहायला जाणार ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन, आराध्याला बच्चन कुटुंबियांपासूनही दूर ठेवणार कारण…

‘मुंबई इंडियन्स’ने कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यामुळे दोन्ही खेळाडूंमधील संबंध खराब झाले असल्याच्या चर्चा रंगत आहेत. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांच्यासह काही खेळाडू आता रोहित शर्माच्या बाजूने आहेत, तर हार्दिक पांड्याला इशान किशनसह संघ मालकांचा खुला पाठिंबा आहे. त्याच प्रमाणे कोचिंग स्टाफही विभागलेला दिसत आहे. हार्दिक पांड्याचे किरॉन पोलार्डबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध हे जगजाहीर आहेत.

आणखी वाचा – आदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर दुसऱ्यांदा थाटला संसार, पहिल्या घटस्फोटानंतर लग्नाचा निर्णय, विवाहाबाबत सत्य समोर

त्यामुळे संघमालक अंबानी कुटुंबाकडून हार्दिकला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे हार्दिककडून खेळात निष्काळजीपणा होत आहे आणि याचे परिणाम संघाला भोगावे लगात आहेत. उदाहरणार्थ, पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ गोलंदाजाला गोलंदाजी देण्याऐवजी तो स्वत: गोलंदाजी करताना दिसला. तसेच दुसऱ्या सामन्यात त्याने १७ वर्षांच्या अनुभव नसलेल्या व नवोदित माफाकाला संधी दिली. पांड्याच्या याच वृत्तीमुळे ‘मुंबई इंडियन्स’ सामने हरत असल्याची टीका केली जात आहे.  

Tags: Cricket NewsIPL 2024mumbai indians
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Abhidnya bhave commented on the inhumane treatment given to dog in Mumbai vs Gujarat ipl match

Video : IPLच्या मॅचदरम्यान मैदानातच कुत्र्याला सुरक्षारक्षकांकडून लाथेने तुडवलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "टीव्हीवर हे दाखवणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.