बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लाखो रुपये, दागिने अन्…; सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला विश्वासघात

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 28, 2023 | 1:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pushkar Shrotri home robbery

Pushkar Shrotri home robbery

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्याच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनेच चोरी केली असल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुष्करलाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे पैशांसह त्याच्या घरातील दागिनेही लंपास करण्यात आले. सोन्याचे दागिने चोरी करत त्या जागी खोटे दागिने ठेवण्यात आले. या केअर टेकर महिलेने तिच्या पतीसह ही चोरी केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्करच्या घरी झालेल्या चोरीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Pushkar Shrotri Home Robbery)

पुष्करच्या घरी केअर टेकर म्हणून काम करत असलेल्या महिलेचं नाव उषा गांगुर्डे तर तिच्या पतीचं नाव भानुदास आहे. पुष्करने घरकामासाठी तसेच त्याच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी केअर टेकर महिलेला कामावर ठेवलं होतं. उषा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत पुष्करच्या घरी काम करत होती. दरम्यान तिने घरामधून १ लाख २० हजार रुपये चोरी केले. पण पुष्करची पत्नी प्रांजलला केअर टेकरच्या वागणूकीमध्ये गडबड जाणवली.

आणखी वाचा – “जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा…”, घटस्फोटाबद्दल होणाऱ्या चर्चांवर सलील कुलकर्णी यांनी सोडलं मौन, म्हणाले, “मला तोंडावर येऊन विचारलं…”

२२ ऑक्टोबरला प्रांजलला उषावर संशय आला. संशय आल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिस चौकशीमध्ये केअर टेकर उषाने पैसे चोरी केल्याचे कबुल केलं. शिवाय ते पैसे उषाने पतीला दिले असल्याचं सांगितलं. उषाच्या पतीनेही तो गुन्हा कबुल केला. शिवाय २४ ऑक्टोबरला घरातील दागिनेही चोरीला गेले असल्याचं पुष्करच्या पत्नीला जाणवलं.

आणखी वाचा – “तू फक्त स्वतःवरच…”, अंकिता लोखंडेला नवरा नको नको ते बोलल्यानंतर सलमान खानची भांडणात मध्यस्ती, म्हणाला, “जर माझी बायको असती…”

View this post on Instagram

A post shared by Pushkar Sudhakar Shrotri (@shrotripushkar)

प्रांजलने कपाट उघडताच तिला तिच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये गडबड वाटली. ज्या दुकानामधून श्रोत्री कुटुंबियांनी सोन्याचे दागिने खरेदी केले होते तिथे ते कपाटातील दागिने घेऊन गेले. मात्र सगळे दागिने खोटे असल्याचं तेव्हा उघडकीस आलं. पुन्हा उषा यांची चौकशी करता खरे दागिने चोरी करुन त्याबदल्यात खोटे दागिने ठेवले असल्याचं कबुल केलं. या सगळ्या प्रकारानंतर २६ ऑक्टोबरला विलेपार्ले पोलिस ठाण्यामध्ये उषा व तिच्या पतीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Tags: entertainment newsmarathi actormarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Chala Hawa Yeu Dya Show Update

'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप, कार्यक्रम बंद होण्यामागचं कारण काय?, निलेश साबळे म्हणतो, "वाहिनीकडून सांगण्यात आले की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.