शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई सुप्रसिद्ध अभिनेत्री तर वडिलांनाही मिळालं प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम, पण मिलिंद गुणाजींचा मुलगा नक्की काय करतो?, म्हणाले, “त्याने…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 21, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Milind Gunaji's son Abhishek is director and his new film will be released soon

आई सुप्रसिद्ध अभिनेत्री तर वडिलांनाही मिळालं प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम, पण मिलिंद गुणाजींचा मुलगा नक्की काय करतो?, म्हणाले, "त्याने..."

मराठीसह हिंदी, बंगाली, भोजपुरी अशा अनेक भाषांत अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे व कायमच आपल्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारे बहुआयामी अभिनेते म्हणजे मिलिंद गुणाजी. मराठीसह हिंदी मालिका व चित्रपटांत अभिनय करत मिलिंद गुणाजी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मिलिंद गुणाजी यांना तुम्ही अनेक मराठी हिंदी चित्रपटातून पाहिले आहे. मराठी ट्रॅव्हल शोमधूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली होती.

मॉडेलिंग आणि अभिनयाबरोबरच त्यांनी गडकिल्ले भटकंती मालिकेचे अप्रतिम सूत्रसंचालनही केले होते. महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या तसेच पुरातन मंदिरांचे दर्शन त्यांनी रसिक प्रेक्षकांना ‘भटकंती’ या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून घडविले. मिलिंद गुणाजींसह त्यांची पत्नी राणी गुणाजी यादेखील एक अभिनेत्री आहेत. उत्तम अभिनेते व अभिनेत्री असलेल्या मिलिंद व राणी यांच्या मुलाने अभिनय हे क्षेत्र न निवडता त्याने दिग्दर्शनात आपली वेगळी वाट निवडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Gunaji (@abhishekgunaji)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज, बिकट अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये भरती, मरण नको म्हणत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुम्ही माझ्यासाठी…”

मिलिंद व राणी यांच्या मुलाचे नाव अभिषेक असं असून आगामी काळात त्याने दिग्दर्शित केलेला ‘रावण कॉलिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबद्दल मिलिंद गुणाजी यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या खास कार्यक्रमात सांगितले. मिलिंद यांचा मुलगा अभिषेक हा एक आयटी इंजिनिअर आहे. मात्र त्याने मनोरंजन क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याने ‘चाल’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले होते. या शॉर्ट फिल्ममध्ये सुमीत राघवन व मिलिंद गुणाजी महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीमुळे अवघ्या ४० दिवसांतच ‘लाल सलाम’ ओटीटीवर, वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

तसेच अभिषेकने काही जाहिरातींसाठीही काम केले आहे. त्याचबरोबर त्याने काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून अभिषेक गुणाजीचा रावण कॉलिंग हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Tags: Abhishek Gunajientertainment newsmarathi actorsmarathi entertainment newsMarathi newsMilind Gunajiअभिषेक गुणाजीमनोरंजन बातमीमराठी अभिनेतेमराठी बातमीमिलिंद गुणाजी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Prathamesh Parab Haldi Ceremony

प्रथमेश परबला लागली क्षितिजा घोसाळकरच्या नावाची हळद, बेभान होऊन नाचले, धमाल-मस्ती अन्…; फोटो तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.