मुलगी असो वा महिला कपडे हा त्यांचं आवडता विषय असतो. शाळा, कॉलेज व ऑफिसमध्ये जाताना नक्की काय घालावं? हा प्रश्न प्रत्येकीला पडतोच. ट्राउझर, शर्ट, कुर्ती, असे अनेक प्रकार आहेतच. मात्र असा एक ड्रेसचा प्रकार आहे जो तुम्ही घालता तेव्हा तुम्हाला सुटसुटीत फील होतं. सध्या महिला किंवा मुली वनपीस घालण्याला अधिक पसंती देतात. पण सतत एकाच प्रकारचे वनपीस घालून कधीतरी कंटाळा येतोच. वनपीस हलकेफुलके, चांगल्या क्वालिटीचे ड्रेस असावेत असे प्रत्येकीला वाटते. पण हे परवडतील तसेच चांगल्या दर्जाचे वनपीस कुठे मिळतील? याबद्दल आता आपण जाणून घेऊया. (One piece dresses shopping)
दादर हे ठिकाण सगळ्या गोष्टीच्या खरेदीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दागिने, फुलांचे मार्केट, लहान मुलांची खेळणी, कपडे अशा अनेक गोष्टींची शॉपिंग करता येते. याच ठिकाणी असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी सुंदर असे वनपीस तुम्हाला खरेदी करता येतील. वनपीस ड्रेसेसमध्ये सध्या खूप नवीन पॅटर्न बघायला मिळतात. ही स्ट्रीट शॉपिंग असली तरीही या ठिकाणी मिळणारे ड्रेसेस अत्यंत चांगल्या क्वालिटीचे असतात. सिल्क वनपीस, कॉटन वनपीस, डेनिम वनपीस असे प्रकार बघायला मिळतात.
दादरच्या या मार्केटमध्ये सुंदर अशा पॅटर्नमध्ये तसेच चांगल्या डिझाईनमध्ये छान असे वनपीस खरेदी करता येतील. तसेच या ठिकाणी केवळ ३५० रुपयांपासून वनपीस मिळतील. वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला या ठिकाणी वनपीसची खरेदी करता येईल. वनपीसबरोबरच बॉडीकॉन ड्रेसेसदेखील खरेदी करता येतील. त्याचप्रमाणे M पासून 4XL या साईजमध्ये तुम्ही वनपीस खरेदी करु शकता. तसेच हे ड्रेसेस उत्तम क्वालिटीमध्ये मिळू शकतील. त्याचप्रमाणे तुम्हाला सुंदर असे रंगदेखील मिळतील.
तुम्हाला ही स्वस्तातल्या वनपीसची खरेदी करायची असेल तर दादर पश्चिम येथील रानडे रोड, नक्षत्र मॉल सिग्नलच्या समोर सुरती फरसाण मार्टच्या बाजूला सोमवार ते रविवार उपलब्ध होतील. त्यामुळे लवकरच या दुकानाला भेट द्या आणि मनसोक्त शॉपिंग करा.