Paaru Marathi Serial Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत खूप मोठी रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या पारू व आदित्य यांच्या मैत्रीत दुरावा आला असल्याचं पाहायला मिळत आहे. पारू व आदित्य यांच्या मैत्रीत अनुष्का नावाचं सावट आलं आहे. अनुष्काच्या येण्याने मालिकेत खूप मोठं वादळ येणार असल्याचं दिसतंय. अनुष्काचा खरा चेहरा अद्याप समोर आलेला नसून ती अहिल्यादेवी व किर्लोस्कर कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. अनुष्काने उत्तम खेळ खेळत साऱ्यांची मनं जिंकली आहेत. अनुष्काचा स्वभाव घरातील सगळ्यांना आवडला असून किर्लोस्करांची सून म्हणून तिला पसंतही केलं आहे.
एकीकडे, आदित्यच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अहिल्यादेवी अनुष्काला आदित्यसाठी मागणी घालणार आहेत. मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्यादेवी अनुष्काच्या घरी जातात. यावेळी त्या पारूलाही बरोबर घेऊन जातात. घरी आल्यावर अनुष्का तिच्या मामीबरोबर सगळ्यांची ओळख करुन देते. त्यांनतर त्या मीटिंगला सुरुवात करतात. अहिल्यादेवी अनुष्काच्या घरी असतानाचा एक प्रोमो दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित कऱण्यात आला.
या प्रोमोमध्ये, अहिल्यादेवी अनुष्काजवळ आदित्यच्या वाढदिवसाला खास सरप्राईज देण्याबाबत बोलतात. अहिल्यादेवी अनुष्काला असं म्हणताना दिसत आहेत की, “उद्या आदित्यचा वाढदिवस आहे. त्याला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे. तू त्याच्या आयुष्यात येणं यापेक्षा अजून स्पेशल काहीच असू शकत नाही. तुझा जर होकार असेल तर तू उद्या येशील”. आता अनुष्का आदित्यच्या वाढदिवसाला पोहोचून होकार कळवणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या असतानाच मालिकेच्या समोर आलेल्या आणखी एका प्रोमोने प्रेक्षकांना धक्का दिला आहे.
आणखी वाचा – दृष्टी धामीने लेकीचं केलं बारसं, पहिल्यांदाच सांगितलं नाव, अर्थही आहे फारच खास
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अहिल्यादेवी व पारू एकमेकींशी बोलताना दिसत आहेत. यावेळी अहिल्यादेवी पारूला असं विचारताना दिसत आहेत की, “मला आदित्यची बायको म्हणून अनुष्का आवडली आहे. पारू तू सांग तुला आवडलीय का अनुष्का?, तुझी नवीन मालकीण म्हणून तुला ती आवडेल का?”. आता पारू यावर काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरेल.