‘ये है मोहब्बतें’ या लोकप्रिय मालिकेमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अभिषेक वर्मा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्याने शोमध्ये ‘आदी’ म्हणजेच मुख्य भूमिकेच्या मुलाची भूमिका साकारली होती. अभिनेता सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे कारण तो लवकरच त्याची गर्लफ्रेंड इदित्री गोयलशी लग्न करणार आहे. अभिषेकने त्याची होणाऱ्या पत्नीबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Abhishek Verma and Iditri Goyal Engagement)
अभिषेक वर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे होणारी पत्नी इदित्री गोयलबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपे एकमेकांबरोबर मस्ती करताना दिसत आहेत. या फोटोमधील मखमली लेहेंग्यात इदित्री सुंदर दिसत आहे. तर अभिषेक वर्माही काळ्या कुर्त्यामध्ये देखणा दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसत आहेत. दोघांमधील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांचा हा फोटो पुरेसा आहे. या फोटोसह अभिषेकने पत्नीसाठी खास कॅप्शनही लिहिलं आहे.
आणखी वाचा – चाहतीने काढला माधवी निमकरच्या नावाचा टॅटू, अभिनेत्रीला ‘ते’ दृश्य पाहून भावना अनावर, म्हणाली, “हा क्षण..”
यामध्ये त्याने होणाऱ्या बायकोसाठीच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “याला खूप गर्व आहे” पासून “तो सर्वात गोड आहे”. हे ऐकण्यापर्यंतचा प्रवास हा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. आम्ही एकत्र घालवलेले दिवस खूप सुंदर होते आणि तुझ्याबरोबर माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान अध्याय सुरु करताना मला आनंद वाटत आहे. ज्या व्यक्तीला मी आता कायमचा त्रास देऊ शकतो अशा व्यक्तीशी माझी ओळख करून दिल्याबद्दल देवाचे आभार. माझी मैत्रीण, माझी पत्नी आणि माझे जीवन. मी तुझ्यावर प्रेम करतो”.
आणखी वाचा – “शहरात घर मिळवण्यासाठी…”, अभिनेत्याचं नवं घर पाहून भारावली ‘नवरी मिळे…’ फेम अभिनेत्री, म्हणाली, “खूप मेहनत…”
दरम्यान, इदित्री गोयल ही उत्तराखंडच्या हल्द्वानी शहरातील रहिवासी आहे. २७ वर्षाच्या इदित्रीने दिल्लीतील मिरांडा हाऊसमधून शिक्षण पूर्ण केले आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती वीरेंद्र गोयल यांची मुलगी आहे. मिलानमधून तिने तिच्या फॅशनचा कोर्स पूर्ण केला असून २०१६-१८ या काळात तिने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर्सबरोबर काम केले आहे. अशातच आता अभिषेक व इदित्री लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.