मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार हे बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तसेच अनेक कलाकार आपल्या अभिनयाबाबत, लिखाणाबाबत इतरांना आपल्या आदर्श स्थानी मानतात. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील एका कलाकाराने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखती आपल्या गुरूंबाबत भावना मांडल्या आहेत. हास्यजत्रेच्या परदेश दौऱ्यानंतर अभिनेता समीर चौघुलेने इट्स मज्जाच्या मुलाखतीत सेटवर तुझ्या काळजाचा तुकडा कोण या प्रश्नाला उत्तर देत सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचं नाव घेतलं.(samir choughule sachin goswami)
समीर म्हणाला मी माझ्या आयुष्यात सचिन गोस्वामी यांना माझ्या वडिलांच्या जागी समजतो. अभिनय क्षेत्रातील अडचणींसोबतच ते माझ्या वयक्तिक आयुष्यतील अडचणींमध्ये देखील माझ्या सोबत राहतात. कोरोना सारख्या काळात देखील त्यांनी मला मदत केली. पाहा सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या बद्दल समीर ने काय भावना व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा- “तुझ्या मांडीवरती शेवटचा श्वास सोडायचा आहे”, रमेश देव यांची शेवटची इच्छा ऐकून रडल्या होत्या सीमा देव, नेमक काय घडलं होतं?
समीरने या मुलाखतीत सांगितलं सचिन गोस्वामी हे त्याच्या वडिलांप्रमाणेच आहेत. हास्यजत्रे व्यतिरिक अनेक गोष्टी समीर सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्या सोबत शेअर करतो तसेच आयुष्यातील अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये देखील गोस्वामी सरांची खूप मदत होते असं देखील समीरने या मुलाखतीमध्ये संगितले. (sachin goswami and sachin mote)
हे देखील वाचा- म्हणून मकरंद अनासपुरे यांना बघून मिसेस अनासपुरेंनी किंचाळत, जोरात दरवाजा लावला…
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे हास्यजत्रेचे दोन मुख्य स्तंभ मानले जातात. हास्यजत्रेच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा या दोंघांनी आपल्या खांद्यावर लीलया पेललेली पाहायला मिळते. हास्यजत्रा ही केवळ महाराष्ट्रभर न थांबता आज जगभर ओळखली जाते यामागे हास्यजत्रेतील या दोन व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे यात शंका नाही. (maharashtrachi hasya jatra cast)