स्ट्रगल काय असतो हे कोणी सांगून समजत नाही त्यासाठी एखाद्याला जवळून समजून घ्यावं लागत मग ती व्यक्ती आज यशाच्या कितीही उंच शिखरावर असो. स्ट्रगल काळ माहिती असून सोबत राहणार व्यक्ती ही तितकाच विश्वासातील असावा आणि वेळोवेळो प्रेरित करणारा असावा लागतो. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील जत्रेत अनेक कलाकार स्ट्रगल करून आज प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसले आहेत. याच कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता रोहित माने.(Rohit Mane’s Wife post)

सावत्या म्हणून आज लोकप्रिय असलेला सातारचा हा कलाकार आजकाल त्याच्या अभिनयाने, धमाल विनोदी टाईमिंग ने चांगलाच चर्चेत असतो. पण हास्यजत्रेच्या आधीचा त्याचा प्रवास त्याची बायको श्रद्धाने एका व्हिडिओ मधून शेअर केला आहे. ‘तू स्वप्न बघितलंस, तू मेहनत केलीस आणि तुला हवं ते मिळवलंस मला तुझा अभिमान आहे’ असं म्हणत श्रद्धाने रोहित ने कॉलेज पासून ते आता पर्यंत मिळवलेल्या सगळ्या बक्षिसांचा, ट्रॉफीजचा, पदकांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हे देखील वाचा – ‘तब्बल ६० वर्षांनी कोठारे कुटुंबात कन्यारत्न जन्मास आलं आणि…’
रोहितच्या या मेहनतीने कमावलेल्या बक्षिसांचा व्हिडिओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसतोय अनेक चाहत्यांनी त्याचं त्तोंडभरून कौतुक केलं आहे. रोहित आणि श्रद्धाची जोडी देखील नेहमी चर्चेत असते या दोघांचे फोटोशूट देखील चांगलंच गाजलं होत.(Rohit Mane’s Wife post)
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील रोहितच प्रत्येक स्किट देखील प्रेक्षकांना चांगलंच भावतंय. हल्लीच रोहितच साताऱ्यावरच प्रेम दर्शवणार रोहीतच एक रील सुद्धा प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेलं. अनेक सातारावासियांकडून रोहितच नेहमीच कौतुक करत तो आमच्या गावचा असल्याचा आम्हला अभिमान आहे असं बोललं जात.