सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतून देवकी या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड. सहज सुंदर अभिनयाने मीनाक्षीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मीनाक्षीचा सोशल मीडियावरील वावर बराच आहे. अनेकदा ती तिचे आणि लेकीसोबतचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडीओ आणि फोटोजला चाहतेही भरभरून प्रेम करत असतात. अशातच मीनाक्षीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(meenakshi rathod)
पहा याराची खास हुकस्टेप (meenakshi rathod)
मीनाक्षीने लेक याराचा एक हुक स्टेप करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये यारा वेड लागलं ची हुकस्टेप करताना दिसतेय तर मीनाक्षीचा पती कैलास वाघमारे वेड लागलंयचं गाणं गाताना दिसतोय. यारालाही वेड लागलंयची भुरळ पडली असल्याचं या व्हिडीओवरून कळतंय. मीनाक्षी कैलासने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. चाहतेही या गाण्याला लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतायत.
वेड या चित्रपटाने आणि चित्रपटातील गाण्याने साऱ्यांनाच वेड लावलं. सामान्य माणूस ते अगदी कलाकारांपर्यंत वेड लागलंय या गाण्याची क्रेज पाहायला मिळाली. इंस्टाग्राम वर तर या गाण्याच्या हुकस्टेपने अक्षरशः धुमाकूळच घातला. तर हे गाणं आजही ट्रेंडिंगवर असून रील्सही केले जात आहेत. या गाण्यात रितेश देशमुख सोबत सर्वांचा भाईजान सलमान खान ने डान्स केला आहे. वेड या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. दरम्यान बॉक्स ऑफिसवर बक्कळ करणाऱ्या चित्रपटात वेड चं नाव आवर्जून घेतलं जात.(meenakshi rathod)
====
हे देखील वाचा – संकर्षण कऱ्हाडेचं सकाळी ८.३० वाजता जेवण्यामागचं गुपित अखेर उलगडलं
====
सैराट चित्रपटानंतर सर्वाधिक अधिक कामे करणारा रितेश देशमुखच्या वेड हा चित्रपट ठरला. वेड या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केले. तर रितेशची पत्नी जेनेलिया देशमुखने ही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, यातील संवाद, गाणी हे सर्व काही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलं आहे.