मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सध्या तिच्या स्टायलिश अंदाज आणि तिच्या सहज सुंदर अभिनय कौशल्यामुळे नेहमी चर्चेत असते. नुकतीच ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून नेहा आणि अनुष्का या दोन्ही भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ही मालिका कमी वेळात लोकप्रिय झाली होती. तर नुकतच या मालिकेने राम राम ठोकला. या मालिकेतील प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या मालिकेमुळे प्रार्थनाच्या फॅन फॉलोईंग मध्ये जबरदस्त वाढ झाली. प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिचे फोटो व्हिडीओ सोशल मीडिययावर व्हायरल होतात, नुकतंच तिने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत एक आनंदची माहिती शेअर केली.(Prarthana Behere)
तिने शेअर केलेल्या व्हिडिओत ती विमानात बसलेली पाहायला मिळते, हा व्हिडिओवर तिने ट्रॅव्हल असं लिहिलं असून तिने कॅप्शनमध्ये हॅशटॅग शूट लाईफ असं लिहिलंय. तर ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात जात आहे. ती लवकरच आता एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार.पण ती कोणत्या प्रोजेक्ट साठी आणि कुठे चालली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तसेच तिची वेबीसिरीज येते कि चित्रपट कि अजून काही हे देखील जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक झालेत. तर तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांसोबत कलाकारांनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
तर ती सध्या लंडनला जात आहे अशी शक्यता अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टवरून वर्तवली जाते. कुशल बद्रिकेने देखील एक एरपोर्टवरील एक फोटो शेअर करत लंडानला जात असल्याची माहिती दिली आहे.त्याने त्याच्या पोस्टच्या अखेरीला प्रार्थनाचे आभार मानलेत. तर आता प्रार्थना आणि कुशल एका प्रोजेक्तमध्ये झळकणार का असा प्रश्न आता चाहत्यांना पडलाय.(Prarthana Behere)
====
हे देखील वाचा – ‘अशोक मामांना आपलं नाव माहित असणं…’ पृथ्वीकची अशोक सराफ यांच्यासाठी भावनिक पोस्ट
====
यासोबतच प्रार्थना तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आहे. ती अनेक बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना भुरळ घालतेय.तर आता प्रार्थना कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे.