गाॅसिप्सवाली मिडिया, पेज थ्रीवाले नाईट लाईफवाले फिल्मवाले आणि सुचेल अशा तशा काॅमेन्टससाठी तय्यार असलेले फॅन्स फाॅलोअर्स यांना सेलिब्रिटीज स्टार्सच्या दोन गोष्टींची उत्तरे झटपट हवी असतात….
पहिला प्रश्न, तू लग्न कधी करणार?(Bollywood Gossips)
माधुरी दीक्षित नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात या प्रश्नाने इतकी आणि अशी जणू कंटाळली की तिने अमेरिकेत जाऊन (१७ऑक्टोबर १९९९) लग्न केल्याची बातमी पंधरा दिवसांनंतर (६ नोव्हेंबर१९९९) तिचा स्टार सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथने इकडे आज तक या वृत्तवाहिनीला दिली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यानंतरही दीड महिन्यांनी (१७ डिसेंबर १९९९) तिने मुंबईत रिसेप्शन ठेवले तेव्हा ‘माधुरीचा नवरा दिसतो कसा ‘ या प्रश्नाचे उत्तर मिळाले. दिसला ग बाई दिसला अशी तिच्या चाहत्यांची भावना होती. मुंबईतील सर्वच वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर डाॅ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित या नवदाम्पत्याचा चार काॅलम दणदणीत फोटो प्रसिद्ध झाला. भारीच कव्हरेज होते हो हे.

सुपर स्टार नटीच्या लग्नाची गोड गोड बातमी कशी आणि किती महत्वाची असते याचे हे एक देखणं उदाहरण. हा झाला पहिला प्रश्न आणि त्याचे एक उत्तर. अशी अनेक उदाहरणे आहेत.आता गाॅसिप्सवाल्यांना पडणारा दुसरा भारी प्रश्न, स्टार कपलच्या संसारात धुसफूस सुरु झालीय, इगो प्राॅब्लेम वाढलाय, काही सांगता येत नाही हो, त्यांच्यात घटस्फोट होईलही, सध्या ते वेगळे राहताहेत वगैरे वगैरे वगैरे प्रश्नांची गुंतागुंत.
हे देखील वाचा- मराठीला ऑस्कर मिळेल अशी रेसिपी आहे का कोणाकडे?
सुपर स्टार राजेश खन्ना व ‘बाॅबी गर्ल ‘ डिंपल कापडिया यांच्या संसारात प्रचंड आदळआपट सुरु आहे याच्या स्टोरीज त्यांच्या अनपेक्षित लग्नानंतर साधारण आठ दहा वर्षांत रंगवून खुलवून वाढवून पसरु लागल्या. त्यांच्या वांद्र्याच्या कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्यातील गोष्टी बाहेर कोणत्या मार्गाने येत हे कधीच समजले नाही. पण ते वेगळे राहू लागले हे दिसू लागले. नशीब तेव्हा सीसी टीव्ही नव्हते अथवा न्यूज चॅनेल नव्हती, अन्यथा एक कॅमेरा आशीर्वाद बंगल्याबाहेर तर दुसरा कॅमेरा जुहूच्या समुद्र महल बंगल्याबाहेर ( डिंपल तेथे आपल्या पित्याकडे आपल्या दोन्ही मुलींसह राहत होती) असता आणि लाईव्ह कव्हरेज असते.(Bollywood Gossips)

काय होती ती घटना(Bollywood Gossips)
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचं नातं सध्या जणू स्कॅनिंगखाली आहे यानिमित्तानेच हा सगळा ‘फोकस ‘ आहे. आज सेलिब्रिटीज कुठेही गेले तरी ती न्यूज असते ( दीपिका आपला नवीन चित्रपट रिलीजच्या दिवशी सिध्दीविनायकाच्या दर्शनाला जाते हीदेखील फोटोसह बातमीच.) आणि कॅमेरे इतकं सुक्ष्म टिपतात की, रणवीर सिंगने पुढे केलेल्या हाताला दीपिकाने स्वीकारले नाही ( झिडकारले असे म्हणता येणार नाही. उगाच पराचा कावळा नको.) हे कॅमेर्याने टिपले, जगासमोर आले, त्याची ब्रेकिंग न्यूज झाली, त्यानंतर ते काय काय करताहेत यावर लक्ष राहिलयं.
‘त्या’ घटनेच्या वेळी दीपिकाचे वडील आणि रणवीरचे सासरे प्रकाश पादुकोण दोघांच्या मध्ये होते हे आपण पाहिलं. बहुतेक त्यांना आपली मुलगी आणि जावई यांच्यात कशावरून तरी तू तू मै मै झाली असावी याची कल्पना नसावी. खरं तर कोणाच्या संसारात छोटे छोटे क्षणिक वाद होत नाहीत सांगा. मध्यमवर्गीयांच्या संसारात आज बाहेर काय जेवायचे? शाकाहारी की मांसाहारी? कुठे जेवायचे? यापासून सुरु होणारा वाद, बाहेर जेवायला गेलेच पाहिजे काय यावर संपतो आणि घरी जेवून पैसे वाचवल्याचा त्यांना ‘मनी’पासून आनंद होतोच.
हे देखील वाचा- कोणतही काम पाहिलं नसताना ‘किती पैसे घेणार? जेव्हा दादा कोंडके मामांना हा प्रश्न विचारतात….

सेलिब्रिटीज देखिल माणसंच आहेत, आज ब्लॅक ड्रेस चांगला दिसेल हे कदाचित रणवीरला पटलं नसेल आणि दीपिकाने हट्टाने तोच ड्रेस घालून येणे पसंत केले असेल यावरुन धुसफूस झाली असेल ही आपली भाबडी समजूत. जे काही असेल ते, पण दीपिकाला आपले एक्प्रेशन लपवता आले नाहीत ( तिला अजून चांगला अभिनय यायला हवा. आजच्या डिजिटल युगातील कॅमेरे मनात काय चाललंय हे चेहर्यावरील रेषांतून बरोबर ओळखतात. )
संसारात तेवढ चालत..(Bollywood Gossips)
संसार म्हटला की, कशावरुन तरी पती पत्नीत बोलचाल होतच असते. वाद किती वाढवायचा हे त्यांच्यावर अवलंबून. सेलिब्रिटीजच्या संसाराची स्टोरी सरळ रेषेत जाणारी नाहीच. त्यात टर्न आणि ट्वीस्ट असतात, निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. पण ते वेगळे राहण्यापर्यंत गोष्टी जाऊ नयेत आणि वेगळे होण्यापर्यंत तर नाते विस्कटून जाऊ नये असे वाटते. अर्थात, रिॲलिटी काय आहे? त्यांच्या चकाचक उंची लॅव्हिश लाईफ स्टाईलमध्ये काय काय घडतयं/बिनसतयं हे त्यांचे त्यांनाच माहीत. ते त्यांचे वैयक्तिक लाईफ जगताहेत. ते सेलिब्रिटीज असल्याने त्यातील अनेक गोष्टी समोर येत राहतात. त्याची न्यूज स्टोरी बनते.

रणवीर व दीपिका यांच्या संसाराचा गोडवा असाच कायम राहूदेत आणि रणवीरचा ओव्हर स्मार्टपणा त्याचा न बदलणारा स्वभाव आहे हे दीपिकाने स्वीकारत आपल्या शूटिंगमध्ये लक्ष केंद्रित करावे एवढेच सांगू शकतो. अर्थात, त्यांचा संसार, त्यांचे संस्कार आणि त्यांचे नशिब यावर त्यांच्या नात्याची पुढची गोष्ट आकार घेत घेत पुढे जाईल. त्यात बेरीज हवी, वजाबाकी नकोच….सेलिब्रिटीज असली तरी ही भावभावना असणारी माणसचं. त्यांना आपलं लाईफ आहे, असतेच. पण तेव्हाच ते किती व कसे अवघड असते हे अगदी ‘हात न धरल्याच्या छोट्याश्या गोष्टींतून दिसतेय/घडतयं/ बिघडतयं ‘.
दिलीप ठाकूर