सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

IPL 2023 बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला समन्स, अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ, नेमकं प्रकरण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 25, 2024 | 6:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Tamannaah Bhatia has been summoned in illegal streaming of IPL 2023

IPL 2023 बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला समन्स, अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ, नेमकं प्रकरण काय?

आपल्या ग्लॅमरस लूक व अभिनयाने चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीया नुकतीच एका कारणामुळे चर्चेत आली आहे.  आयपीएल २०२३शी संबंधित एका प्रकरणात तिला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले असून अभिनेत्रीला २९ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याच प्रकरणी अभिनेता संजय दत्तलाही समन्स बजावण्यात आले होते. मात्र तेव्हा अभिनेत्याने नवीन तारखेची मागणी केली. त्यामुळे आता या प्रकरणामुळे तमन्ना अडचणीत सापडली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियाला फेअरप्ले ॲपवर मॅचच्या बेकायदेशीर स्ट्रिमिंगबाबत चौकशीसाठी बोलावले. न्यूज एजन्सी एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, “महाराष्ट्र सायबरने फेअरप्ले ॲपवर IPL २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावलं आहे. या स्ट्रीमिंगमुले वायकॉम कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे तिला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ती सायबर सेलच्या प्रश्नांना उत्तरं देण्यास बांधील असेल”.

View this post on Instagram

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

आणखी वाचा – मुलगा असावा तर असा! अभिषेक बच्चनने वडिलांसमोर बसायला दिला नकार, मान खाली घालून स्टेजवरुन खाली आला अन्…; बिग बींच्या संस्कारांचं होत आहे कौतुक

बेकायदेशीर स्ट्रिमिंगच्या तपासाचे हे प्रकरण सप्टेंबर २०२३चे आहे, जेव्हा वायकॉमने ‘फेअरप्ले’ ॲपवर त्यांच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे (IPR) उल्लंघन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. नेटवर्ककडे सामने स्ट्रीम करण्याचे अनन्य अधिकार असूनही, ‘फेअरप्ले’ ॲप कथितरित्या ते बेकायदेशीरपणे प्रसारित करत होते, ज्यामुळे नेटवर्कचे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे. 

आणखी वाचा – विकी कौशलने केलं मराठमोळ्या अभिनेत्याचं कौतुक, मराठी भाषेत साधला खास संवाद, म्हणाला, “संतोषबरोबर काम करणं…”

दरम्यान, तमन्नाला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर व्हावे लागणार आहे. या तपासाच्या माध्यमातून, फेअर प्ले ॲपवर आयपीएल २०२३च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगबद्दलचा पोलिस शोध घेत आहेत. तमन्नाला समन्स बजावण्यात आल्याची ही बातमी समोर येताच काही चाहत्यांनी अभिनेत्रीबद्दल चिंता वाटत आहे. याशिवाय काही चाहते अभिनेत्रीला पाठिंबा देत तिला पाठिंबा देताना दिसत आहेत.

Tags: bollywood newsIPL 2023 Illegal Streaming Casetamannaah Bhatia
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Next Post
Sarita Thakur was Cheated by her mother, betrayed by her husband and abandoned by her daughters know her painful life

आईने फसवलं, पतीकडून विश्वासघात अन् मुलींनीही सोडली साथ ; सचिन पिळगांवकरांबरोबर दिसलेली ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री जगत आहे एकाकी जीवन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.