एखाद्याला वेगळ्या अवतारात पाहिलं कि अगदी सहज आपण म्हणतो काय रे सोंगाड्या पण सोंगाड्या म्हणलं कि फिल्मी माणसाला आठवणार एक नाव म्हणजे सोंगाड्या अजरामर करणारे दादा कोंडके. लोकांचं तुफान मनोरंजन करणाऱ्या या सोंगाड्याचा स्मृतिदिन. १९६९ पासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेला अभिनेता कोन असं कोणी विचारलं तर हक्काने कोणताही मराठी माणसू दादा कोंडकेंचं नाव घेण्यास संकोच करणार नाही.(Dada Kondke pandu hawaldar)
लेखक, दिगदर्शक, निर्माते, अभिनेते अशा विविध शैलीचं घबाड म्हणजे दादा कोंडके. चित्रपटाचं नाव असं ठेवावं कि ते वाचूनच प्रेक्षकांच्या मनात त्याबद्दल कुतुहूल निर्माण झालं पाहिजे आणि तशी नाव ठेवण्यात दादांचा हात कोणी धरत न्हवत. भन्नाट नावाचे असे दादांचे बहुतके चित्रपट चांगलेच गाजले कधी कधी वादाचा मुद्दा हि झाला पण दादांनी कधी त्यांना जुमानलं नाही आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ही गाडी अशीच सुसाट धावती ठेवली. बोट लावीन तिथ गुदगुल्या, मुका घ्या मुका, सासरचे धोतर, पळवा पळवी अशा अनेक धमाल चित्रपटाची नाव ठेऊन तेवढ्याच विनोदी दर्जाचे चित्रपट दादांनी चित्रपट इतिहासात अजरामर केले.

तसेच दादांनी लिहिलेली अनेक गाणी ही चांगलीच आजही गाजतात. त्यात ‘अंजनीच्या सुता’ हे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील भजन आजही तेवढ्याच भक्ती भावानं ऐकलं जात. मनोरंजन विश्वात आज यशाच्या सर्वोच शिखरावर असणारी मंडळी ही दादा कोंडके यांच्या आठवणीने भावुक होतात.
=====
दे देखील वाचा- सहकुटुंब सहपरिवार फेम पश्याचं रिअल लाइफ अंजीसोबत पार पडलं केळवण
=====
दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत एक अशा चित्रपटाची भर आहे ज्यामुळे प्रसिद्ध झालेला एक अभिनेता आज असंख्य हृदयांवर राज्य करत आहे. ते अभिनेते म्हणजे बहुरुपी अशोक सराफ. अशोक सराफ हे अशोक मामा या लाडक्या नावाने ओळखले जातात. मामांनी स्वतःच्या आत्मचरित्रात दादानं सोबत पहिल्यांदा झालेली भेट आणि दादांसोबतचा पहिला चित्रपट याबद्दलची एक आठवण लिहिली आहे.
बरेचदा अशोक सराफ यांचा पहिला चित्रपट म्हणून ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाचं नाव सांगितलं जात पण हा अशोक सराफ यांचा पहिला नाही तर तिसरा चित्रपट होता.
हवालदाराच्या भूमिकेसाठी आधी ही होती दादांची पसंती(Dada Kondke pandu hawaldar)
अशोक सराफ यांच्या आधी पांडू हवालदार मधील दुसऱ्या हवालदारची भूमिका निळू फुले साकारणार होते पण त्यांनी नकार दिल्यामुळे ही भूमिका अशोक सराफ यांच्या कडे आली आणि अशोक मामांनी ती तुफान गाजवली देखील. जेव्हा दादा कोंडके यांच्या कडे या नावाची उकल करण्यात आली तेव्हा दादांनी अशोक सराफ यांचं कोणतंही काम पाहिलेलं न्हवत. भेटीअंती दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना ‘किती पैसे घेणार?’ असा सवाल केला तेव्हा लगेच अशोक मामांनी तुम्ही द्याल तेवढे घेईन असं सांगून टाकलं कारण अशोक सराफ यांना दादा कोंडके यांच्या सोबत काम करण्याची संधी सोडायची नव्हती.

कोणत्याही अभिनेत्याला ज्या व्यक्तिमत्वा सोबत काम करण्याची संधी न सोडावी असं वाटण हि त्या व्यक्तिमत्वाच्या कलेची पोचपावती असते असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक प्रयोगात, चित्रपटात, कथेत काहीतरी नावीन्य असावं दादांचा हा अट्टहास त्यांना इतरांपेक्षा वेगळा ठरवतो.