शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रंगभूमीवर रंगणार ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असा प्रयोग; एका नाटकात शरद पोंक्षे तर दुसऱ्या नाटकात ‘हा’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 3, 2023 | 6:02 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Me nathuram godse boltoy Marathi play on stage again

Me nathuram godse boltoy Marathi play on stage again

निर्मितीनंतर पहिल्याच प्रयोगासाठी मिळालेला नकार, त्यानंतर काही वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रंगभूमीवर निवडक प्रयोगाची संधी आणि पुन्हा वादविवादात अडकल्यानंतर थांबवलेलं नाटक म्हणजे विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’. काही वर्षांपूर्वी प्रचंड वादग्रस्त ठरलेलं हे नाटक २०१७साली थांबवण्यात आलं. आता सहा वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. एकाच वेळी दोन नाटकं येऊ घातल्यामुळे ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असा प्रयोग रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. (Me nathuram godse boltoy Marathi play on stage again)

यापूर्वी रंगभूमीवर गाजलेलं माऊली प्रॉडक्शन अंतर्गत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक लवकरच पुन्हा रंगभूमीवर पदार्पण करत आहे. ‘नथुराम’च्या भूमिकेत दिसलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक घेऊन येत असल्याचं जाहीर केलं आहे. नाटकाचं शार्षक जवळपास सारखंच असल्यामुळे  न्यायालयीन वाद होण्याची शक्यता दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

आणखी वाचा – “आई भारतामध्ये फक्त…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला तिच्या लेकाने इंग्रजीमध्ये न बोलण्याची दिली ताकीद, अभिनेत्री म्हणाली, “खंत वाटते की…”

ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी यांनी लिहिलेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक निर्माते उदय धुरत यांनी १९९८ साठी माऊली प्रॉडक्शनतर्फे रंगभूमीवर आणलं होतं. या नाटकाचे दिग्दर्शन विनय आपटे यांनी केलं. शरद पोंक्षे यांनी या नाटकात साकारलेलं ‘नथुराम’ हे पात्र बरंच लोकप्रिय झालं होतं. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक बरंच चर्चेतही राहिलं. या नाटकाचे ८१६ प्रयोग झाल्यानंतर  हे नाटक थांबविण्याचा आले. यानंतर शरद पोंक्षे यांनी ‘हे राम नथुराम’ या नवीन नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं.

View this post on Instagram

A post shared by Uday Dhurat (@mauliproductions)

आणखी वाचा – किंग खान शाहरुखच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटात झळकणार होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर; पण झालं असं की…

आता नाट्यनिर्माते उदय धुरत हे नाटक पुन्हा घेऊन येत आहे. या नाटकाचे विवेक आपटे दिग्दर्शन करत असून या नाटकाची तालीम ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. मात्र या नाटकात ‘नथुराम’च्या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले दिसणार आहे. हे नाटक ऑक्टोबरमध्ये येणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.तर आता दुसरीकडे शरद पोंक्षे यांच्या ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाची जाहिरात १५ ऑगस्टला प्रसिद्ध झाली. शरद पोंक्षे या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार असून नाटकाचे ५० प्रयोग होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

आणखी वाचा – Video: “लहानपणी ही तू सुरातच रडायचास…”, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर सागर कारंडे घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी खास व्यक्तीचं पत्र

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता नव्याने रंगभूमीवर येत असताना ‘नथुराम’ या भूमिकेचं आव्हान कोण पेलणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर सौरभ गोखलेची निवड करण्यात आली आहे.

Tags: again the famous Marathi actormarathi playMe nathuram godse boltoysharad pokshe
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
OMG 2 OTT release date

अक्षय कुमारचा 'OMG २' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, वाचा कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.