छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेली मालिकांपैकी एक म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. मालिकेतील यश व नेहाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्याचबरोबर परीच्या क्युटनेससह मालिकेतील अन्य व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळालं. यश आणि नेहाच्या या मैत्रीचा दुवा ठरला तो म्हणजे यशचा मित्र समीर, आणि ही भूमिका केली होती अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने. पण खरंतर समीरच्या भूमिकेसाठी संकर्षणला पहिली पसंती नव्हती. तर ती होती, अभिनेता अजिंक्य राऊत याला. (mazi tuzi reshimgath sameer’s role first choice)
मालिका व सिनेमांमध्ये आपल्याला अनेकदा दिसणारा अभिनेता अजिंक्य राऊत लवकरच ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर री-एन्ट्री करणार असून त्यानिमित्ताने अजिंक्य सध्या मालिकेचे ठिकठिकाणी प्रमोशन करतोय. त्याचबरोबर मालिकेचं शूटिंगसुद्धा सुरु असून मालिकेसाठी तो मेहनत घेताना दिसत आहे. (ajinkya raut)
समीरच्या भूमिकेबद्दल काय म्हणाला अजिंक्य ? (ajinkya raut on sameer’s role in mtr)
याच मालिकेच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत अजिंक्यने समीरच्या भूमिकेबद्दलचा खुलासा केला. अजिंक्य म्हणाला, “मला पहिल्यांदा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील समीरची भूमिका ऑफर करण्यात आली. पण काही वैयक्तिक कारणांमुळे मी ती भूमिका करू शकलो नाही. त्यानंतर संकर्षण कऱ्हाडेने ही भूमिका साकारली.”
“मला मुख्य भूमिका साकारायला मिळेल, अशा मालिकेच्या शोधात होतो. काही दिवसांनी मला ‘मन उडू उडू झालं’ची ऑफर आली, ज्यात माझी मुख्य भूमिका होती. माझ्या वाट बघण्याचं फळ मला मिळालं. तेव्हा मी सहकलाकाराची भूमिका नाकारली, मात्र नंतर मुख्य भूमिका मिळाली. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे योग्य वेळीच येते,” असं अजिंक्यने सांगितलं.
अभिनेता अजिंक्य राऊतने ‘विठू माउली’, ‘मन उडू उडू झालंय’ ही मालिका करण्याबरोबरच ‘टकाटक २’ व ‘सरी’ या सिनेमातही दिसला असून लवकरच तो ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत राजवीरच्या भूमिकेत दिसणार आहे. (abol pritichi ajab kahani)
हे देखील वाचा : नवीन मालिकेचं शुटिंगआणि अजिंक्यची तब्येत खालावली