अभिनेत्री नेहा पेंडसेने अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. पण तिला जास्त लोकप्रियता मिळाली, ती ‘भाभीजी घर पर है’ आणि ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेमुळे. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नेहाने अनेक मराठी, हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. पण, गेल्या काही काळापासून ती या क्षेत्रातून दूर होती. नेहाने २०२० मध्ये शार्दुल सिंग बायसशी लग्न केले असून लग्नानंतर नेहा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येते. (Neha Pendse reveals froze her eggs)
सोशल मीडियावर मात्र प्रचंड सक्रिय असलेली नेहा कायमच विविध कारणांनी र्चेत असते. मात्र, आता ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नेहाने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या मातृत्वाबद्दल बोलताना Eggs Freeze केल्याचा खुलासा केला आहे. नेहा नुकतीच ‘मे आय कम इन मॅडम’ मालिकेच्या दुसऱ्या सीझनमधून छोट्या पडद्यावर परतली आहे. त्यावेळी ‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना तिने मातृत्व स्वीकारण्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नेहा या मुलाखतीत म्हणाली, “लग्न झाल्यानंतर वर्षभरातच मला आई व्हावं, अशी भावना माझ्या मनात यायला लागली. मुळात जिला कधीच आई व्हायचं नव्हतं, तिच्या मनात अशा भावना येणं ही गोष्ट माझ्या आकलना पलिकडची होती. त्यानंतर मी यावर गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली. कारण एक मूल सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे.”
हे देखील वाचा – ‘दार उघड बये’ मालिकेने घेतला अखेर प्रेक्षकांचा निरोप, मुक्ताची भावुक पोस्ट, सेटवरून घेऊन गेली ‘ही’ खास गोष्ट
“मी याविषयी बराच विचार केला आणि माझे Eggs Freeze करण्याचा निर्णय घेतला. माझी आई व्हायची मनापासून इच्छा आहे, पण इतक्यात मी यासाठी तयार नाही. माझ्या नवऱ्यानेच मला हा सल्ला दिला. कदाचित मी आई होईन किंवा नाही होणार, कारण माझ्या मनातही याबद्दल बऱ्याच शंका कुशंका आहेत. मात्र, मला कुणावरही अवलंबून राहायचं नाही. मी स्वतःला सुपरवुमन अजिबात मानत नाही, कारण घर सांभाळणं आणि काम करणं या दोन्हीसाठी लागणारी ऊर्जा माझ्यामध्ये नाही.”, असं नेहा या मुलाखतीत म्हणाली.
हे देखील वाचा – “ते बघून मला रडू आलं”, ३६ दिवस अमेरिकेत राहिल्यानंतर भारतात परतणार संकर्षण कऱ्हाडे; म्हणाला, “तिथे असणारी मराठी माणसं…”
झी मराठीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत दिसलेल्या नेहाने ‘प्यार कोई खेल नही’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘दाग द फायर’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकली आहे. शिवाय, ती ‘बिग बॉस’च्या १२व्या पर्वात सहभागी झाली होती. ‘जून’ या मराठी चित्रपटात ती शेवटची दिसली होती.