शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दार उघड बये’ मालिकेने घेतला अखेर प्रेक्षकांचा निरोप, मुक्ताची भावुक पोस्ट, सेटवरून घेऊन गेली ‘ही’ खास गोष्ट

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 9, 2023 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saniya Chaudhari post on Daar Ughad Baye

'दार उघड बये' मालिकेने घेतला अखेर प्रेक्षकांचा निरोप

गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहे. ‘लोकमान्य’, ‘यशोदा’, ‘हृदयी प्रीत जागते’ यांसारख्या मालिकांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले, पण टीआरपीच्या शर्यतीत मागे पडल्याने या मालिका कमी काळातच बंद झाल्या. अशातच याच वाहिनीवरील आणखी एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. साधारण वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या ‘दार उघड बये’ या मालिकेने ३०० भाग पूर्ण केल्यानंतर नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. (Saniya Chaudhari post on Daar Ughad Baye)

मुक्ता व सारंगची केमिस्ट्री व मालिकेचा वेगळा विषय यांमुळे ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर मालिकेतील अन्य कलाकारांच्या अभिनयाचे तितकेच कौतुक करण्यात आले. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यानिमित्त मुक्ता हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरी भावुक झाली असून तिने मालिकेच्या सेटवरून काही खास गोष्टी तिच्या घरी नेल्या आहेत.

सानियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मालिकेच्या सेटमधील काही फोटोज शेअर केले. ज्यामध्ये ती मालिकेचे कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञांसह दिसत आहे. शिवाय, तिने या मालिकेच्या सेटमधून संबळ आणि देवीची मूर्ती तिच्या घरी नेली असून त्याचादेखील फोटोज तिने शेअर केले.

हे देखील वाचा – “आम्हाला मूल नको…” प्रार्थना बेहेरेने केलं स्पष्ट भाष्य; म्हणाली, “आमच्या कुटुंबियांना वाटतं की…”

हे फोटोज शेअर करताना सानिया म्हणाली, “‘मुक्ता’चा वर्षभराचा अविस्मरणीय प्रवास आज संपला. उद्यापासून मुक्ता तुमच्या भेटीला नसेल. या कथेला जरी पूर्णविराम मिळत असला, तरी मुक्ता माझ्यामध्ये कायमची सामावली गेली. खंबीर, बेधडक, अन्याय सहन न करणारी, पण तितकीच प्रेमळ, गोड आणि हळवी! आपली कला आणि नातीसुद्धा जीवापाड जपणारी मुक्ता! जिने कलेवर जिवापाड प्रेम करणं नव्याने शिकवलं… मुक्ताचे खूप खूप आभार! मला ही भूमिका साकारायला मिळाली म्हणून आणि प्रेक्षकहो तुमचेसुद्धा आभार, कारण तुमच्या प्रेमाने मला शेवटच्या भागापर्यंत त्याच उत्साहाने मुक्ता साकारण्याची ताकद दिली.”

हे देखील वाचा – नवऱ्याला ‘आजोबा’ म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, ‘काय म्हणता…’

View this post on Instagram

A post shared by Saaniya Chaudhari (@saaniyachaudhari_official)

“संपूर्ण मालिकेत माझे सगळ्यात जास्त सीन्स चित्रित झाले ते संबळ आणि देवीआई सह! मालिकेची सुरुवात मी संबळ वाजवत झाली आणि शेवट ही संबळ वाजवतच झाला. यांना अंतर कसं देणार? म्हणून सेटवरुन माझ्या जिवाभावाच्या या दोन्ही गोष्टी : संबळ आणि देवी आई चा मुखवटा हक्काने माझ्या सोबत घरी घेऊन आले! आता त्या कायम माझ्याजवळ असतील आणि ‘मुक्ता’ कायम माझ्या मनात असेल!”, असं सानिया या पोस्टमध्ये म्हणाली. तिच्या या पोस्टवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी “सुरेख व्यक्त झालेयस बाळ”, अशी कमेंट करत कौतुक केले आहे. त्याशिवाय, मालिकेतील अन्य कलाकार व चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला.

Tags: daar ughad bayemarathi serialssaniya chaudharizee marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Sankarshan karhade share a post America tour

“ते बघून मला रडू आलं”, ३६ दिवस अमेरिकेत राहिल्यानंतर भारतात परतणार संकर्षण कऱ्हाडे; म्हणाला, “तिथे असणारी मराठी माणसं...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.