अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता आणि तिचे पती सत्यदीप मिश्रा यांनी काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. मसाबा व सत्यदीप हे दोघे त्यांच्या पहिल्या बाळाच्या प्रतीक्षेत होते. आता अखेर या जोडप्याने आई-बाबा झाले असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. या जोडप्याने जाहीर केले आहे की, ते एका मुलीचे पालक बनले आहेत. दोघांनीही त्यांना मुलगी झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. आयुष्याच्या या नव्या टप्प्यात पाऊल ठेवताना त्यांनी आपल्या मुलीची पहिली झलकही दाखवली. (Masaba Gupta Welcomes Daughter)
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी, मसाबा गुप्ता व सत्यदीप मिश्रा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्याची आनंदाची बातमी दिली आणि तिची जन्मतारीख देखील उघड केली. शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये चंद्र व पांढरे कमळ दर्शविणारी निळ्या पार्श्वभूमीची दृश्ये होती. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आमची अतिशय खास लहान मुलगी एका खास दिवशी आली. ११.१०.२०२४ रोजी. मसाबा आणि सत्यदीप”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरचा होणारा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?
दुसऱ्या स्लाइडवर त्याच्या मुलीच्या पायाचे छायाचित्र आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “११.१०.२४”, असं म्हणत काही इमोजीही शेअर केले आहेत.१९ एप्रिल रोजी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि अभिनेता सत्यदीप मिश्रा यांनी घोषित केले की ते त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत. जानेवारी २०२३ मध्ये बॉम्बे वेल्वेट अभिनेत्याबरोबर लग्न करणाऱ्या मसाबाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एका पोस्टमध्ये ही बातमी शेअर केली होती.
३४ वर्षीय फॅशन डिझायनरने पोस्टमध्ये लिहिले की, “दोन छोटे पाय आमच्या दिशेने येत आहेत. कृपया प्रेम, आशीर्वाद भरभरुन पाठवा”. सत्यदीपने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरही हे शेअर केले आहे. मसाबाचे यापूर्वी निर्माते मधु मंतेनाबरोबर लग्न झाले होते. या जोडप्याने जून २०१५ मध्ये लग्न केले आणि २०१९ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. ५१ वर्षीय सत्यदीपचे लग्न अदिती राव हैदरीसह झाले होते.