बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi फेम ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरचा होणारा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 12, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi fame Kokan Hearted Girl Ankita Walawalkar future husband kunal bhagat information see the details

Kokan Hearted Girl अंकिता वालावलकरचा होणारा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो? जाणून घ्या...

‘बिग बॉस मराठी ५’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली इन्फ्लूएंसर म्हणजे अंकिता वालावलकर. घरात गेल्यापासून अंकिताच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अंकिताने अनेकदा तिचे लग्न जमल्याची माहिती दिली. पण ती कुणाशी लग्न करतेय याविषयी माहिती तिने दिली नव्हती. अशातच आज अंकिताने बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर केला. अंकिता होणाऱ्या पतीला कोकण हार्टेड बॉय या नावाने हाक मारायची. मात्र तो नेमका कोण आहे, याबाबत तिने सांगितलं नव्हतं. त्यामुळे अंकिताचा होणारा पती कोण आहे? याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. अखेर अंकिताने ती ज्याच्याशी लग्न करणार आहे, त्याच्याबद्दल खुलासा केला आहे. (Ankita Walawalkar Future Husband)

याआधी सांगितल्याप्रमाणे अंकिताने आज १२ ऑक्टोबर रोजी आपल्या होणाऱ्या पतीबरोबरचा फोटो शेअर करून त्याचं नाव जाहीर केलं. अंकिताचा होणारा पती कुणाल भगत आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘सूर जुळले’ असं कॅप्शन दिलं आहे, त्यामुळे आता हा कुणाल भगत कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कुणाल भगत हा प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक व लेखकही आहे. कुणालने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे. कुणाल करण सावंतबरोबर मिळून काम करतो. 

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

आणखी वाचा – रामचरणने आलियाच्या लेकीसाठी दत्तक घेतला हत्ती, अभिनेत्रीने सांगितली त्यामागची रंजक कथा, म्हणाली, “राहाच्या जन्मानंतर…”

कुणाल-करण  या जोडगोळीने ‘पांडू’, ‘अथांग’, ‘नवरदेव’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ यासारख्या चित्रपट आणि मालिकांना संगीत दिलं आहे. झी मराठीवरील “तू चाल पुढं” या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी कुणाल-करणला अवॉर्डही मिळाला होता. कुणाल हा कोकणातला आहे. अंकिता आणि कुणाल दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. दोघांनी ‘आनंदवारी’ या गाण्यात एकत्र काम केलं होतं.  अंकिताच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. आनंदवारी हे गाणं कसं तयार झालं याचा किस्सा देखील अंकिताने बिग बॉसच्या घरात सांगितला होता.

आणखी वाचा – दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित मराठी चित्रपटाची घोषणा, टॉपचे कलाकार मुख्य भूमिकेत, टीझरची चर्चा

दरम्यान, कुणाल व अंकिता दोघांच्या अकाउंटवर त्यांचे काही फोटो आहेत. अंकिता व कुणालच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. अंकिता व कुणाल फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहेत. त्यामुळे आता सर्वजण त्यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत.

Tags: Ankita Walawalkar Future HusbandAnkita Walawalkar Husband Kunal BhagatBigg Boss Marathi 5 Fame Ankita Walawalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
13 october 2024 Sunday daily horoscope pleasant day for Virgo, Pisces, Libra people see the details

13 October Horoscope : कन्या, मीन, तूळ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आनंददायी, तुमच्या नशिबात काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.