शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रामचरणने आलियाच्या लेकीसाठी दत्तक घेतला हत्ती, अभिनेत्रीने सांगितली त्यामागची रंजक कथा, म्हणाली, “राहाच्या जन्मानंतर…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 12, 2024 | 4:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
South actor Ram Charan adopted an elephant for Bollywood actress Alia's daughter Raha

साऊथ अभिनेता रामचरणने आलियाची मुलगी राहासाठी दत्तक घेतला एक हत्ती, अभिनेत्रीच सांगितले सत्य

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि साऊथचा अभिनेता राम चरण यांची खूपच चांगली मैत्री आहे. आलिया व रामचरण यांनी एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि तेव्हापासून त्यांच्यात चांगलेच बंध निर्माण झाले होते. अशातच राम चरणने आलियाची मुलगी राहासाठी अशी गोष्ट केली आहे, जी सर्वांच्याच हृदयाला भिडणारी आहे आणि यामुळे राम चरणाबद्दलचा आदर आणखीनच वाढला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रामचरणने राहासाठी हत्ती दत्तक घेतल्याचा एक किस्सा अभिनेत्री आलिया भट्टने सांगितला आहे. (Ram Charan Adopted Elephant)

अभिनेत्री आलिया भट्टने ‘सुरेश प्रॉडक्शन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले  की, “तारक, मी आणि राम चरण वेगवेगळ्या वेळापत्रकांमुळे ‘आरआरआर’च्या सेटवर जास्त वेळ एकत्र घालवू शकलो नाही. पण प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटलो होतो आणि यामुळे आमच्यात चांगलीच मैत्री झाली. या मैत्रीमुळे रामचरण माझ्या मुलीसाठी एक हत्ती पाठवला आणि यामुळे मला आश्चर्य वाटले”.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

यापुढे आलिया असं म्हणाली की, “राहा जन्माला आल्यानंतर एक महिना मी फिरायला गेली होती. अचानक कोणीतरी येऊन मला सांगितले की, “मॅडम, राम चरण सरांनी हत्ती पाठवला आहे”. हे ऐकताच मला आश्चर्य वाटले. मला वाटलं काहीही होऊ शकते. माझ्या बिल्डिंगमध्ये सध्या एक महाकाय हत्ती फिरत असावा”. मात्र, हा हत्ती खरा नसून लाकडाचा असल्याचेही यावेळी आलियाने सांगितले.

आणखी वाचा – ‘का रे दुरावा’ मालिकेनंतर सुयश व सुरुची पुन्हा एकत्र, नव्या नाटकाची केली घोषणा, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

यापुढे आलियाने सांगितले की, राम चरणने राहाच्या नावाने जंगलात एक हत्ती दत्तक घेतला होता. त्यानंतर घरी एक लाकडी हत्ती पाठवण्यात आला आणि या हत्तीचे नाव त्यानी ‘एली’ ठेवले आहे. आलियाने राहासाठी हा हत्ती डायनिंग टेबलवर ठेवला आहे. आलियाच्या म्हणण्यानुसार राहा या हत्तीच्या पाठीवर बसून खेळते.

आणखी वाचा – दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित मराठी चित्रपटाची घोषणा, टॉपचे कलाकार मुख्य भूमिकेत, टीझरची चर्चा

दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आलिया सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जिगरा’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. करण जोहरच्या प्रोडक्शनचा हा चित्रपट वासन बाला यांनी दिग्दर्शित केला आहे. आलियाच्या या चित्रपटाला सध्या संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

Tags: Bollywood entertainment newsramcharan elephant adoptramcharan elephant adopt for raha news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi fame Kokan Hearted Girl Ankita Walawalkar future husband kunal bhagat information see the details

Bigg Boss Marathi फेम ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरचा होणारा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.