मराठी मनोरंजन क्षेत्रातील गौतमी देशपांडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘माझा होशील ना?’ या मालिकेमुळे ती अधिक प्रकाशझोतात आली. सध्या गौतमी अभिनयापासून दूर असलेली पाहायला मिळते. मागील वर्षी ती सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांचाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार व मित्रमंडळीनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि त्यांना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली होती. (Gautami Deshpande husband birthday)
गेल्या वर्षी २५ डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली. मेहंदी, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असे लग्नाचे अनेक सोहळे मोठ्या थाटामाटात पार पडले. पण आता लग्नानंतर गौतमीने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला एक खास सरप्राइज दिले आहे. सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी प्रेमाची सुरुवात ते लग्न हा प्रवास कसा होता? हे सांगितले आहे.
गौतमीने शेअर केलेला व्हिडीओ हा खूपच सुंदर असून या व्हिडीओमध्ये गौतमी व स्वानंद यांच्या प्रेमाची सुरुवात नक्की काशी झाली? कोणी कोणाला प्रपोज केले? याबद्दल सांगताना दिसत आहेत. तसेच लग्नसमारंभामध्ये मृण्मयी देशपांडेने केलेली धमाल आणि मित्र मैत्रिणींचा कल्ला असे सगळे काही दाखवण्यात आले आहे. यामध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
तिने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनदेखील दिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “मी विचार करत होते की तुझ्याबरोबरचे काही फोटो शेअर करावे. पण नंतर मी विचार केला की आपल्या लग्नाचा खास व्हिडीओ शेअर करुन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा का देऊ नये? वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा My Love”. दरम्यान या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. गौतमीने शुभेच्छा दिल्यानंतर स्वानंदची पोस्टदेखील चर्चेत आली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये स्वानंदी झोपलेली दिसत आहे तसेच वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तिने आयफोन दिल्याबद्दल तिचे आभारदेखील मानले आहेत.