ठिकठिकाणी गणेशोत्सवाची लगबग सुरु असून अनेकांच्या घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे. काही जण आपल्या राहत्या घरी साजरी करतात, तर काही जण गणेशोत्सवासाठी त्यांच्या मूळगावीकडे रवाना होतात. सर्वसामान्यांप्रमाणे मराठी मनोरंजन सृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते अविनाश नारकर हेदेखील गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावी निघाले आहे. विशेष म्हणजे, तब्बल चार वर्षांनी ते आपल्या गावी जात असून त्याचा एक व्हिडिओ नुकतंच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. (Avinash Narkar left for his hometown for Ganesh Festival)
अविनाश नारकर दरवर्षी त्यांच्या कुटुंबियांसह मुंबईत लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत करतात. पण यंदाचा गणेशोत्सव त्यांच्यासाठी विशेष आहे. कारण, ते यंदाचा गणेशोत्सव आपल्या कोकणातील गावी साजरा करणार आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने अविनाश नारकर यांना गावी जाण्याची ओढ लागली असून ते कोल्हापूर मार्गे आपल्या गावी निघाले आहे. या प्रवासादरम्यानचा एक नयनरम्य व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
हे देखील वाचा – अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘द केरला स्टोरी’च्या दिग्दर्शकांनी व्यक्त केलं मत, म्हणाले, “चित्रपट न बघताच…”
अविनाश नारकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये इंद्रधनुष्य दिसत असून या व्हिडिओसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “‘ इंद्रधनुष्य…!!’, गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी कोकणात माझ्या गावी जाताना… कोल्हापूर मार्गे….बाप रे… चार वर्षांनंतर… एक आगळी ओढ लागली आहे…!!”. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – Video : निवेदिता सराफ यांनी बनवले ‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवरच मोदक, व्हिडिओ व्हायरल
अविनाश नारकर सध्या आपल्याला ‘३६ गुणी जोडी’ व ‘कन्यादान’ या मालिकांमध्ये दिसत आहे. अभिनयाबरोबरच अविनाश नारकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून ते अनेक फोटोज व व्हिडिओज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतात. विशेष म्हणजे, त्यांच्या डान्सच्या व्हिडिओची नेहमीच चर्चा होत असून नुकतंच त्यांच्या गणेशोत्सवाची व्हिडिओ देखील चर्चेत आली होती.