शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Majjacha Adda : “विनोद लोकांपर्यंत पोहोचला नाही तर…”, विनोदाच्या टायमिंगबाबत अशोक सराफांचं मोठं विधान, म्हणाले, “मोठमोठ्या कलाकारांनाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 16, 2023 | 2:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Majjacha Adda with Ashok Saraf

"विनोद लोकांपर्यंत पोहोचला नाही तर...", विनोदाच्या टायमिंगबाबत अशोक सराफांचं मोठं विधान, म्हणाले, "मोठमोठ्या कलाकारांनाही..."

Majjacha Adda with Ashok Saraf : अशोक सराफ आणि विनोद हे अनोखं समीकरण आहे. उत्कृष्ट अभिनयशैली, विनोदाचं अचूक टायमिंग, हटके बोलीभाशा यांत अशोक मामांचा हात कुणीही धरू शकत नाही, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कित्येक कलाकार मंडळी हे अशोक सराफ यांच्या अभिनयापासून प्रेरित आहेत. गेली कित्येक वर्षे अशोक मामांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आजवर अशोक सराफ यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

विनोदाचा बादशाह अशी ओळख असलेले मामा विनोदाची वेळ चुकली की दुखी होतात. नुकत्याच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विनोदाच्या टायमिंगबाबत भाष्य केलं. अशोक सराफ म्हणाले, “एखादा विनोद केला आणि तो लोकांपर्यंत नाही पोचला तर अतिशय दुःख होत. तो विनोद लोकांपर्यंत का पोचला नसेल, आपली नेमकी यात काय चूक झाली, वेळ इकडे तिकडे झाली का? असे अनेक प्रश्न येतात. मात्र वेळ ही इकडे तिकडे होत नाही, आणि ही वेळ शब्दात सांगता येत नाही. ही वेळ चुकली का, नेमकं काय झालं असेल असं काही झालं की खूप गोंधळ उडतो. आणि विनोदाची ही वेळ चुकू नये म्हणून मी अक्षरशः आटापिटा करत असतो.

आणखी वाचा – Majjacha Adda : “विनोदी नाटक असूनही कोणच हसलं नाही अन्…”, अशोक सराफ यांनी सांगितला भन्नाट किस्सा, म्हणाले, “गुंड किंवा मोठा दादा…”

अशोक मामा पुढे म्हणाले, “स्टेजवर वापरत असताना मी यासाठी कायम सतर्क असतो. आजुबाजुकडे माझं अजिबात लक्ष नसत. कारण वेळ ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे सहसा कोणाला कळत नाही. प्रेक्षकांना एखादा विनोद आवडला की ते खळखळून हसतात. पण यामागे त्या विनोदाचा वेळ महत्त्वाचा असतो. एखाद विनोदी वाक्य तुम्ही कसं बोलता, त्या वाक्याची शुद्धता आणि ते वाक्य सरताना समोरच्या सहकलाकाराने त्याच वाक्य कुठून सुरु करायचं याचीही एक वेळ असते. आणि हे असं झालं तर त्याचा प्रभाव पडतो”.

आणखी वाचा – Majjacha Adda : अशोक सराफांनी सांगितल्या ‘हम पांच’ मालिकेच्या आठवणी, म्हणाले, “फोटोतील बायकोबरोबर संभाषण…”

यापुढे उदाहरण देत ते म्हणाले, “‘एक होता शिंपी’ या नाटकादरम्यान लेखकाने मला एक मोठं वाक्य लिहून दिलं होत, आणि ते वाक्य पूर्ण झालं की प्रेक्षकांचा मोठा हसा मिळायचा. एकेदिवशी मी म्हटलं हे माझं वाक्य आहे, ते तोडून मी तुला तीन लाफ्टर काढून दाखवतो असं म्हटलं. आणि ते वाक्य मी तीन ठिकाणी तोडलं आणि तीन ठिकाणी तीन लाफ्टर मिळवले. बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांनाही हे टायमिंगचं गणित माहित नव्हतं. जेव्हा विनोदाची वेळ चुकते तेव्हा मला खूप दुःख होतं” असं ते म्हणाले.

Tags: Ashok Saraf in Majjacha AddaAshok Saraf latest interviewItsmajja exclusive interview of ashok sarafमज्जाचा अड्डा अशोक सराफ
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
munawar faruqui rumoured ex girlfriend ayesha khan wild card entry in bigg boss 17

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’ मध्ये मोठा ट्विस्ट, मुन्नवर फारुकीच्या एक्स गर्लफ्रेंडची शोमध्ये एण्ट्री, म्हणाली, "त्याने गुन्हा केला अन्..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.