प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरला तिच्या सुंदर आवाजासाठी ओळखली जाते. शिवाय तिच्या सौंदर्यामुळे ती आज महाराष्ट्राची क्रश बनलेली आहे. छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या आर्याने मराठीसह अनेक हिंदी गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्याचबरोबर तिने अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. अशातच या गोड गळ्याच्या गायिकेला एका प्रसिद्ध संगीतकारांसह काम करण्याची संधी मिळाली आहे. (Aarya Ambekar sings a song for Chandramukhi 2 film)
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतच्या ‘चंद्रमुखी २’ चित्रपटातील ‘स्वागाथांजली’ हे गाणं आर्याने गायलं आहे. विशेष म्हणजे, या गाण्यासाठी आर्याला ऑस्कर विजेते प्रसिद्ध संगीतकार एमएम किरवानी यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली. सोशल मीडियाद्वारे तिने ही बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा अनुभव अद्भुत असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले. यावेळी तिने संगीतकार एमएम किरवानी, गीतकार वैभव जोशी आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. आर्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा पोस्टर व रेकॉर्डिंगचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
हे देखील वाचा – “मृतदेह आमच्या गाडीमधून त्यांनी…”, वडिलांबाबत अश्विनी महांगडेची अंगावर काटा आणणारी पोस्ट, म्हणाली, “त्यांनी मेलेल्या माणसाला…”
शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आर्या म्हणाली, “तुम्ही कधी असा अदभूत आनंद अनुभवला आहे? मला ‘चंद्रमुखी २’, सुंदर अश्या कंगना रानौतसाठी आणि दिग्गज असे एमएम किरवानीजींसाठी गाणं गाण्याची जेव्हा संधी मिळाली. तेव्हा हा अनुभव मला आला. वैभव जोशी दादाने खूप सुंदर लिहिलं असून ज्यांनी या गाण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे मी मनापासून आभार मानते. गणपती बाप्पा मोरया !!”, असं म्हणत तिने हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याचे आवाहन केले आहे.
हे देखील वाचा – “आईच्या इच्छेखातर…” ऋतुजा बागवेला तिचं नवीन घर घेण्यास तिच्या आई-वडिलांनी दिला होता पाठिंबा, म्हणाली, “माझ्या बाबांनी मला…”
तिची ही पोस्ट व्हायरल होताच कलाकारांसह चाहत्यांनी गायिकेचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंट करत म्हणते, “अखेर तू दोन चंद्रमुखीसाठी गाणं गायली आहेस”, असं म्हणत तिचे अभिनंदन केले.