बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा व राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर ही जोडी सध्या दिल्लीत असून राघवच्या दिल्लीतील घरात परिणितीचा गृहप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, लग्नानंतर काही दिवसांतच अभिनेत्रीने लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता. याची चर्चा अजून थांबलेली नसताना आता या जोडीने नुकताच लग्नापूर्वीच्या विधींची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Parineeti-Raghav Pre Wedding Rituals)
२३ व २४ ऑक्टोबरला उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. मात्र, त्यापूर्वी चंदीगड येथे दोन्ही कुटुंबीयांमध्ये क्रिकेटसह अनेक खेळांचे सामने रंगले. ज्यात संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत आदी खेळांचा समावेश होता. यावेळी परिणिती-राघवसह दोन्ही कुटुंबीय व मित्रपरिवारांनी यात सहभागी होत लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. या खेळाचे अनेक फोटोज दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या या फोटोजमध्ये परिणिती–राघवसह दोघांचे कुटुंबीय व मित्र परिवार खेळाचा भरपूर आनंद लुटताना दिसत आहे. परिणिती तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “आमच्या पारंपरिक लग्नसोहळ्याला सुरुवात करण्यासाठी आम्ही आमच्या लग्नापूर्वीचे विधी तुमच्यासमोर शेअर करत आहोत. आम्ही क्रिकेट, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत यांचा पुरेपूर आनंद घेतला. हे फक्त जिंकणं किंवा हारणं नव्हतं, तर अविस्मरणीय असे क्षण, मजा-मस्ती, आनंद, चिअर्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्यात झालेल्या बंधाबद्दल आहे. आमची चड्ढा-चोप्रा लढाई ही एक महाकाव्य लढाई होती, ज्यात दोन्ही पक्ष जिंकले आणि खऱ्या अथाने एकमेकांची मने जिंकले.”
हे देखील वाचा – “असा अनुभव तुम्हाला आला?” प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने गायलं कंगना रानौतच्या चित्रपटासाठी गाणं, अभिनेत्रीने केली कमेंट, म्हणाली, “शेवटी तू…”
तर राघव त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला, “हे आमच्या लग्नापूर्वीचे विधी, ज्यात संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत आणि क्रिकेटसारख्या मैत्रीचे खेळ होते. खरोखरच आनंददायी होते. जरी आम्ही यात हरलो असलो, तरी आम्ही निश्चितपणे चोप्रा कुटुंबीयांची मने जिंकली आहे. विशेषकरून परीची, जी आमच्या कुटुंबाची सदस्य बनली आहे.” दोघांच्या या पोस्टवर चाहते लाईक्स व कॅमेंट्सद्वारे भरभरून प्रेम देत आहेत.
हे देखील वाचा – ‘फुकरे ३’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; ‘द वॅक्सिन वॉर’, ‘चंद्रमुखी २’ला मागे टाकत तीन दिवसांत केली इतकी कमाई
दरम्यान, दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर आता ग्रँड रिशेप्शनच्या तयारीला सुरुवात झाली आहे. चंदीगड आणि मुंबईत हा ग्रँड रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. यावेळी बॉलिवूडसह अनेक मान्यवर मंडळी हाजरी लावणार आहेत.