शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आईच्या इच्छेखातर…” ऋतुजा बागवेला नवीन घर घेण्यास तिच्या आई-वडिलांनी दिला होता पाठिंबा, म्हणाली, “माझ्या बाबांनी मला…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 2, 2023 | 5:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rutuja Bagwe Mazya Gharachi Goshta

ऋतुजा बागवेला नवीन घर घेण्यास तिच्या आई-वडिलांनी दिला होता पाठिंबा

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत तिच्या अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘नांदा सौख्यभरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका आणि ‘अनन्या’ या नाटकात तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्याचबरोबर तिने ओटीटी विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ऋतुजाकडे अनेक चित्रपट असून लवकरच ती ‘अंकुश’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Rutuja Bagwe Mazya Gharachi Goshta)

अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ऋतुजाने नुकतीच एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसमोर शेअर केली. काही महिन्यांपूर्वी ऋतुजाने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून नुकताच तिच्या नव्या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पडला होता. तिच्या गृहप्रवेशाचे अनेक फोटोज जोरदार व्हायरल झाले होते. सध्या ती तिच्या नवीन घरात राहायला गेली असून ‘इट्स मज्जा’ने ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमातून ऋतुजाच्या नव्या घराची सफर घडवून आणली आहे.

‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत यावेळी ऋतुजाने तिच्या नवीन घराबद्दल बोलताना तिच्या आयुष्यात घडलेले अनेक किस्से शेअर केले. त्याचबरोबर तिच्या घर घेण्याच्या या निर्णयाला तिच्या आई-वडिलांचा पाठिंबा कसा मिळाला? याबद्दल ती भरभरून बोलली आहे. म्हणतात ना, प्रत्येकाची त्याच्या स्वप्नांची एक बकेट लिस्ट असते. तशी बकेट लिस्ट ऋतुजाची सुद्धा होती. खरंतर ऋतुजाच्या मनात घर घेण्याचा विचार नव्हता. पण तिच्या आईच्या इच्छेखातर जेव्हा तिने हा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या आई-वडिलांनी पूर्ण पाठिंबा दिला होता.

हे देखील वाचा – ‘फुकरे ३’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; ‘द वॅक्सिन वॉर’, ‘चंद्रमुखी २’ला मागे टाकत तीन दिवसांत केली इतकी कमाई

View this post on Instagram

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)

हे सांगताना ऋतुजा म्हणाली, “खरंतर माझं घर घेण्याचं असं काही स्वप्न नव्हतं. पण माझी आई मला नेहमी म्हणायची की, मुलींनी आर्थिक व मानसिकरीत्या सक्षम असायला हवं. त्यामुळे ती मला स्वतःचं घर घे, असं आधीपासून सांगत आलेली. त्यामुळे माझ्या मनात याबाबतचा विचार सुरु होता. अन् त्यात मला लहानपणापासून एक पैसे साठवण्याची सवय आहे. जे काही १० रुपये मिळाले, त्यातले पाच रुपये साठवायचे. तर ती साठवण्याची जी काही रक्कम होती, ती हळूहळू इतकी वाढली. अशी एक वेळ आली की, ज्यावेळेस आता घराचा विचार करायला हरकत नाही, घ्यायची का उडी? तर मी जेव्हा आई-बाबांना विचारलं, तेव्हा त्यांनी लगेच या निर्णयाला पाठिंबा दिला. माझे बाबा इतके कमालीचे आहेत की, त्यांनी मला कधीच मुलीसारखं वागवलं नाही. एखाद्या मुलाप्रमाणे त्यांनी वागवलेलं आहे.”

हे देखील वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली, “प्रेम, आनंद अन्…”

“मी घर घेतेय, हे जेव्हा आईला सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली, “आता ही योग्य वेळ आहे. कारण मुलीच्या आयुष्यात काही ना काहीतरी परिवर्तन व्हायला हवी. तू स्वतःचं घर घे. आणि मला माझ्या मुलीची पाठवणी करायची आहे. मग ती सासरी नको असू दे, मला तिच्या घरात तिची पाठवणी करू दे. नंत्तर मी घर शोधायला सुरुवात केली आणि मला निसर्गाच्या सानिध्यात मला स्वतःचं हक्काचं घर मिळालं.”, असं ऋतुजा म्हणाली.

Tags: mazya gharachi gosht itsmajjamazya gharachi goshta
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Aarya Ambekar sings a song for Chandramukhi 2 film

"असा अनुभव तुम्हाला आला?" प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने गायलं कंगना रानौतच्या चित्रपटासाठी गाणं, अभिनेत्रीने केली कमेंट, म्हणाली, "शेवटी तू…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.