मालिकांचा प्रेक्षकांच्या मनोरंजनात महत्वाचा वाटा आहे.मालिका त्यातील कलाकार रोज प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. मालिकेच्या कथानकाला प्रेक्षक लवकर आपलस करतात.कलाकारांच्या ऑनस्क्रीन जोड्या त्यांचं पडद्यामागचं बॉण्डिंग यांविषयी जाणून घ्यायला कायमच प्रेक्षकांना उत्सुकता असते. (nava gadi nava rajya bts)
सध्या एकपेक्षा एक अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनेक नवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. त्यातच ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे.सुरुवातीपासून या मालिकेने आपलं वेगळेपण जपलं आहे.राघव, आनंदी, रमा, चिंगी यांना जितकं प्रेम मिळत आहे तितकंच प्रेम मालिकेतील इतर पात्रांना देखील मिळताना पाहायला मिळते.
पाहा नवा गडी नवं राज्य मालिकेचा खास बीट्स (nava gadi nava rajya bts)
सध्या मालिकेत वर्षा व नंदूच्या लग्नाची तयारी सुरु आहे.वर्षा तिची आई ही पात्र देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. यातच अभिनेत्री वर्षा दांदळे म्हणजेच राघवच्या आईने वर्षाच्या लग्नाच्या सीनचा बीट्स शेअर केला आहे.यात वर्षाचा लग्नातला लूक पाहायला मिळतो आहे. सगळे एकमेकांशी गप्पा मारत आहेत.’गप्पा आणि गप्पा.. मेकअपरूम.. सुखदुःखाची साथी’ असं म्हणतं त्यांनी हा बीट्स शेअर केला आहे.(nava gadi nava rajya bts)
दिवसातला अनेक तास कलाकार सेट वर असतात. मालिकेच्या निमित्ताने अनेक वर्ष इतका वेळ एकमेकांसोबत काम करून आपली टीम सहकलाकार म्हणजे एक कुटुंबच होऊन जातात.पडद्यावर दिसणाऱ्या सहज,सोप्या गोष्टींमागे बरीच मेहनत असते. लग्नाचे सीन्स शूट होताना विशेष मेहनत घेतली जाते. एका सिन मागे देखील बरीच मेहनत असते. बीट्स च्या माध्यमातून ही पडद्यामागची मेहनत आणि धमाल पाहायला मिळते.
हे देखील वाचा : अबोलीचा नवा प्रोमो होतोय जोरदार ट्रोल, नेटकरी म्हणतात, ‘हे बघून यम स्वतः…’