रविवार, जून 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीने गाणं शिकवणाऱ्या मुलीला दिले पैसे, अक्षरापासून कायमचा दूर होणार का?, नवं वादळ

Saurabh Moreby Saurabh More
मे 7, 2024 | 5:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial update new promo

अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीने गाणं शिकवणाऱ्या मुलीला दिले पैसे, अक्षरापासून कायमचा दूर होणार का?, नवं वादळ

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कथानकात येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील अक्षरा व अधिपती या जोडीलाही प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. अशातच मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्या प्रेमात विरजण टाकायला एका पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरीने नवी चाल आखत अक्षरा व अधिपतीच्या संसारात मिठाचा खडा टाकण्यासाठी सरगमला आणलं आहे.

अधिपतीला गायन शिकायचं असतं. तेव्हा चारुहास व अक्षरा भुवनेश्वरीकडे जाऊन तिची परवानगी घेतात. भुवनेश्वरी अधिपतीला गायन शिकण्याची परवानगी देते. मात्र ती स्वतःच अधिपतील गाणं शिकवण्यासाठी शिक्षिका आणते. एकदम ग्लॅमरस अशा शिक्षिकेला ती अधिपतीला गाणं शिकवायला घेऊन येते. अक्षराला अगदी पाहिल्या दिवसापासून ती पटत नाही. तर भुवनेश्वरी डाव आखत त्या सरगम मॅडमला अधिपतीच्या आयुष्यात स्थान मिळवण्यास सांगतात. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “भावना महत्त्वाची आणि आपले संस्कार…”, बॉलिवूड अभिनेत्रीच्या पाया पडण्यावरुन कुशल बद्रिकेला नेटकऱ्याचा प्रश्न, उत्तर देत म्हणाला, “प्रश्न वयाचा…”

या नवीन प्रोमोमध्ये भुवनेश्वरी सरगमपुढे पैशांनी भरलेली बॅग ठेवत तिला “हे मानधन तुमच्यासाठी आहे” असं म्हणते. यावर सरगम मॅडम भुवनेश्वरीला “मला अधिपतीला माझ्या प्रेमात पाडायचं आहे ना?” असं विचारते. यावर पुन्हा भुवनेश्वरी तिला असं म्हणते की, “तुला अधिपतीला प्रेमात पाडायचं नाही, तर त्या दोघांचे लग्न मोडणे हा आमचा उद्देश आहे” असं म्हणते. यावर सरगम भुवनेश्वरीला “हे तुम्ही कशासाठी करत आहात?” असा प्रश्नही विचारते. मग यावर भुवनेश्वरी पुन्हा तिला “तुम्हाला जेवढं काम सांगितलं आहे, तेवढंच करा, प्रश्न विचारू नका” असं उत्तर देते आणि मग सरगमही हे काम करायला संमती दर्शवते.

आणखी वाचा – “मराठी लोकांना घर न देणाऱ्यांना…”, मतदान करणाऱ्यावरुन रेणुका शहाणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “कुठल्याही जाती, धर्म, भाषेच्या विरुद्ध नाही पण…”

दरम्यान, येत्या भागात सरगम मॅडम अधिपतीला त्यांच्या प्रेमात जाळ्यात ओढणार का? भुवनेश्वरीच्या इच्छेप्रमाणे अधिपती व अक्षरं यांचे लग्न मोडण्यात ती यशस्वी होणार का? तसेच भुवनेश्वरीने सांगितलेलं कार्य सरगम पार पाडू शकेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sakav Webseries Actors
Entertainment

‘गाव गाता…’ नंतर दिगंबर नाईक व अस्मिता खतखते पहिल्यांदाच एकत्र, ‘साकव’वेबसीरिजमध्ये झळकणार

जून 28, 2026 | 11:00 am
Daryabhavani Movie poster release
Entertainment

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास दिसणार ‘दर्याभवानी’मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा उलगडणार

जून 27, 2026 | 4:12 pm
mumbai local train news
Entertainment

“सरकार काय करतंय, इथे जीवाची किंमत नाही”, मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाच्या हत्येने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला धक्का, म्हणाली…

जून 27, 2026 | 12:50 pm
Hardik Pandya and Mahieka Sharma get married
Entertainment

कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल

जून 27, 2026 | 10:33 am
Next Post
The Family Man series third season’s shooting started post viral on social media

खुशखबर! बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात, श्रीकांत तिवारी नवीन मिशनवर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.