घराघरात दर संध्याकाळी लागणाऱ्या छोट्या पडद्यावरील मालिका हा प्रेक्षकांसाठी जणू जीव की प्राण असतात. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न साहजिकच वाहिनी, मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक करतात. एकीकडे विविध विषयांवर आधारित अनेक मालिका येत असताना काही लोकप्रिय मालिका अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कधीकधी मालिकेत ट्वीस्ट अँड टर्न्स येण्यासाठी त्यांच्या कथानकात बदल करतात. जे कधी प्रेक्षकांच्या पसंतीस पडतं, तर कधी त्यांना पटत नाही.
सध्या स्टार प्रवाहवरील मालिका पाहणाऱ्यांची संख्या जास्त असून अनेक मालिका अश्या आहेत, ज्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहे. अशीच एक मालिका म्हणजे ‘अबोली’. पोलीस ऑफिसर अंकुश आणि एका सध्या घरातील मुलगी अबोली यांची कहाणी दाखवणाऱ्या या मालिकेत आतापर्यंत अनेक ट्वीस्ट घडलेले असून त्यातील काही ट्वीस्ट प्रेक्षकांच्या पचनी पडलेला नाही. मात्र या मालिकेचा नवा प्रोमो नुकतंच आला असून हा प्रोमो मात्र जोरदार ट्रोल होत आहे. (aboli new promo trolled)
‘अबोली’चा नवा प्रोमो समोर (aboli new promo out)
काही दिवसांपूर्वी मालिकेत मालिकेत असं दाखवण्यात आलं की, अंकुश अपघातानंतर पूर्णपणे विसरतो आणि अबोलीला विसरून जातो. मात्र अंकुशची स्मरणशक्ती परत येण्यासाठी अबोली जिवाचं रान करते. मात्र या सगळ्यांमध्ये अबोलीवर हल्ला होतो आणि त्यात तिचा मृत्यू होतो. मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये अबोलीचा मृत्यूनंतर अंकुशला त्याचा सगळा भूतकाळ आठवतो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जेव्हा अंकुश अबोलीशी शेवटचं बोलतो, तेव्हा अचानक अबोली जिवंत होते आणि ती अंकुशला काहीतरी सांगत असते. मात्र यांमुळे अंकुश व तिच्या घरातील सगळेच जण घाबरलेले असतात.
मालिकेचा हा नवा प्रोमो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र चांगलंच ट्रोल केलं. एक नेटकरी यावर संताप व्यक्त करत म्हणते, “मेलेली लोक कधी जिवंत होतात का काही पण दाखवतात मूर्ख”. तसेच आणखी एका युझरने कमेंट करत म्हटलंय, “दुसऱ्यांचा जीव घ्यायला येणारा यम स्वतः आत्महत्या करून मेला असेल हे बघून”. (aboli new promo trolled)

अबोलीच्या पुढच्या भागात काय घडणार, हे लवकरच कळेल. मात्र मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केलं आहे.
हे देखील वाचा : हिंदी मालिकेचा रिमेक.?का होतोय तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो ट्रोल